शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोबाईल गेमवर, बोर्ड गेम पर्याय : सागरने तयार केले हाताने गेम्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 01:03 IST

कुटुंबासह मित्र-मैत्रीणींसोबत बसून खेळता येईल, मेंदूला ताण देता येईल, आपल्या कल्पनांना भरारी देता येईल, असे ‘बोर्ड गेम्स’ तयार केले. हे गेम्स काही वेळेसाठी का होईना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे, कुटुंबाला जवळ आणण्याचे पर्याय ठरले.

ठळक मुद्देकुटुंब, मित्रांना एकत्र आणण्याचा असाही प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे स्मार्टफोनमुळे नातेसंबंध बिघडत चालले आहे तर, दुसरीकडे ‘ब्लू व्हेल’, ‘मोमो चॅलेंज’, ‘पब्जी’ सारखे गेम्स मुलांसह मोठ्यांनाही आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. एकूणच बघता-बघता हसत्या खेळत्या घरावर दु:खांचा डोंगर कोसळत आहे. कुटुंबामधील सदस्यांचा संवाद हरवत चालला आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव एका तरुणाने घेतला. लहानपणीसारखेच आपल्या कुटुंबाने आपल्याशी खेळावे, संवाद साधावा, मज्जा करावी या विचाराने झपाटलेल्या त्या तरुणाने यावर उपाय शोधला, तो बोर्ड गेमचा. कुटुंबासह मित्र-मैत्रीणींसोबत बसून खेळता येईल, मेंदूला ताण देता येईल, आपल्या कल्पनांना भरारी देता येईल, असे ‘बोर्ड गेम्स’ तयार केले. हे गेम्स काही वेळेसाठी का होईना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे, कुटुंबाला जवळ आणण्याचे पर्याय ठरले.सागर पवार त्या तरुणाचे नाव. सागर शिक्षणासाठी सहा वर्षे पुण्यात होता. काही वर्ष त्याने मुंबई, बंगरूळू येथेही काढले. या वर्षांत त्याचा कुटुंबाशी असलेला संवाद कमी झाला. शिक्षण पूर्ण करून जेव्हा तो घरी परतला तेव्हा, सुरूवातीच्या दोन-तीन दिवसानंतर आपल्या कुटुंबाकडे आपल्याशी बोलण्यासाठी विषय नसल्याचे जाणवले. घरातील समस्या, वैयक्तीकबाबी सोडून कुठलाच विषय समोर येत नव्हता. प्रत्येक जण स्वत:ला मोबाईलमध्ये हरवून घेत होते. वेळ होता, परंतु तो नसल्यासारखी वागणूक होती. लहानपणी आई-बाबा, भाऊ-बहिणीसोबत खेळलेली साप-सीडी, लुडो, व्यापार हे गेम खेळताना किती मजा यायची. याची त्याला सारखी आठवण यायची. ते दिवस किती सुंदर होते, ते पुन्हा येतील का, असे त्याला नेहमी वाटायचे. आणि यातूनच त्याला ‘बोर्ड गेम’ची कल्पना सूचली. त्याचे पदवीचे शिक्षणही ‘अ‍ॅनिमेशन’मध्ये झाले होते. यामुळे क्राफ्ट पेपर, स्केच पेनच्या मदतीने गेम तयार करण्यास त्याला मदत झाली. सुरूवातीला तयार केलेले गेम त्याला स्वत:लाच आवडले नाही. अनेक प्रयत्नानंतर त्याने दोन ते आठ लोक जोडीने खेळू शकतील असा ‘इंटरॅक्टीव्ह बॅटलफील्ड’ गेम तयार केला. हा पहिला गेम सागर आपल्या कुटुंबाशी खेळला. सर्वांच्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आपले काहीतरी चुकत होते, हे प्रत्येकाच्या लक्षात आले. त्यानंतर कित्येकदा सागरच्या कुटुंबाने एकत्र बसून हा खेळ खेळला.सागरलाही आपले कुटुंब आपल्या जवळ आले तर इतरांचे का नाही, मोबाईलला दूर ठेवणे शक्य आहे, हे दाखवून देण्यासाठी त्याने या गेमसोबत इतरही काही गेम तयार केले. नातेवाईकांना, मित्रांना गिफ्ट म्हणून हे गेम दिले. त्यांच्यासोबत तो खेळला, इतरांनाही सहभागी करून घेतले. हळूहळू त्याच्या या प्रयत्नाला यश येत गेले. काही मोबाईलवेडे विद्यार्थी, ‘पब्जी’ गेमच्या व्यसनात सापडलेले मित्र या ‘गेम्स’मुळे त्याच्यातील मोबाईलचे व्यसन कमी झाल्याचे दिसून आल्यावर सागरने आता ही मोहीमच हाती घेतली आहे. मोबाइल गेमवर ‘बोर्ड गेम’ चांगला पर्याय ठरत आहे.‘लोकमत’शी बोलताना सागर म्हणाला, माझे कुटुंब, माझे मीत्र या बोर्ड गेममुळे एकत्र आले तर इतरांचे का नाही म्हणून मी हे गेम तयार केले आहे. यात ‘इंटरॅक्टीव्ह बॅटलफील्ड’, ‘चेक आऊट’, ‘ड्रिम्स विदीन नाईटमेअर’सह आठ गेमचा समावेश आहे. हे गेम्स आठ वर्षांवरील सर्वांसाठी आहे. या गेम्समधून एकमेकांशी संवाद साधणे, कल्पनांना भरारी देणे, विचार करायला लावणारे, मेंदूला चालणा देणारे आणि निख्खळ मनोरंजन करणारे आहेत.

टॅग्स :Mobileमोबाइलnagpurनागपूर