शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-नागरिकांचा संताप भोवला, दंगलग्रस्त भागातील ठाणेदाराकडून काढली जबाबदारी

By योगेश पांडे | Updated: April 1, 2025 22:40 IST

१७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हंसापुरी येथील नागरिकांनी संजय सिंग यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता.

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १७ मार्च रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दंगलीनंतर स्थानिकांमधील रोष ठाणेदार संजय सिंग यांना भोवला आहे. त्यांच्याकडून ठाणेदारपदाची धुरा काढण्यात आली असून, गुन्हे शाखेतील निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्याकडे ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान देशमुख यांच्यासमोर राहणार आहे.

१७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हंसापुरी येथील नागरिकांनी संजय सिंग यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता. मध्य नागपुरातील आमदार प्रवीण दटके यांनीदेखील त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती व बदलीची मागणी केली होती. सिंग यांच्याकडे काही काळाअगोदरच तहसीलची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र नागरिकांचा रोष लक्षात घेता त्यांच्याऐवजी आता शुभांगी देशमुख यांच्याकडे ठाणेदारपद देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी याबाबत निर्देश जारी केल. शुभांगी देशमुख या कणखर अधिकारी म्हणून ओळखल्या जातात व तहसीलमध्ये त्यांच्यासमोर अनेक आव्हाने राहणार आहेत.

हिंसाचार पसरविणाऱ्यांना धडा शिकविणार : पोलिस आयुक्तदरम्यान, हिंसाचार पसरविणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्त बोलत होते. रामनवमीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल अव्हेन्यूवरील अग्रसेन भवन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तहसील, कोतवाली आणि गणेशपेठ येथील पोलिस अधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. दि. १७ मार्चचा हिंसाचार दुर्दैवी होता. पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली. आवश्यक बळाचा वापर करण्यात आला. हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्याचे काम सुरू आहे. अनेक आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जाईल आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल. पोलीस कोणालाही सोडणार नाहीत. आरोपी कितीही शक्तिशाली किंवा प्रभावशाली असले तरी ते गुन्हेगारच आहेत. सोशल मीडियावरील चॅट्स, फोटो, सीसीटीव्ही फुटेजच्या स्वरूपात पोलिसांना आरोपींविरुद्ध अनेक ठोस पुरावे मिळाले आहेत. त्या आधारे, फरार लोकांचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

जर भविष्यात कोणी अशा हिंसाचारात सहभागी झाला तर त्याला एक संस्मरणीय धडा शिकविला जाईल. पोलीस जनतेचे शत्रू नाहीत. फक्त गुन्हेगारांनीच त्याला घाबरावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूर