शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी राजीनामे द्यावेत : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 17:07 IST

राज्य सरकारचे काही बोलघेवडे मंत्री बोलत राहिले, आणि समाजाचं नुकसान म्हणत राहिले. त्यांच्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले असून त्या ओबीसी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

नागपूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अहवाल न्यायालयानं फेटाळला. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

आघाडी सरकारने ओबीसी समाजाशी बेईमानी केली. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट पूर्ण करा आणि आरक्षण द्या, असं सांगितलं होतं. परंतु, राज्य सरकारने ते केले नाही. तसे केले असते तर आज ही वेळ आली नसती, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला. 

राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे. या सरकारने दिशाभूल करणारा अंतिम अहवाल सादर केल्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी, आोबीसी समाजाचं मोठ नुकसान करणारा असल्याचे बावनकुळे म्हणाले. राज्य सरकारमधील ओबीसी असलेल्या मंत्र्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

आता आरक्षणाशिवायच आगामी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या ७५ टक्के भागामध्ये निवडणुका आहेत. त्यात २००० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नगर परिषद, नगरपंचायती आणि मोठ्या महानगरपालिकांच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. याचा प्रचंड मोठा फटका समाजाला बसला असून आता ओबीसी नेतृत्वच तयार होणार नाही. ओबीसी समाजाच नेतृत्व घालून टाकण्याची भूमिका या सरकारने घेतली असल्याची टीका त्यांनी केली.

या सरकारचे बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले आणि समाजाचं नुकसान म्हणत राहिले. त्यांच्यामुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. आजच्या स्थितीला महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी मंत्रीच जबाबदार असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामे द्यावे अशी मागणी बोवनकुळे यांनी केली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय