शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एमआयटीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 21:37 IST

पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. शिवानी प्रशांत टेकाडे (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती धंतोलीतील निर्मल अपार्टमेंटमध्ये राहत होती.

ठळक मुद्देपितृछत्र हरवल्यामुळे होती अस्वस्थ : धंतोलीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. शिवानी प्रशांत टेकाडे (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती धंतोलीतील निर्मल अपार्टमेंटमध्ये राहत होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानीच्या वडिलांचा जानेवारी महिन्यात अपघात झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून शिवानी कमालीची अस्वस्थ होती. शिवानी वडिलांची अत्यंत लाडकी होती. तिचेही तिच्या वडिलांवर खूप प्रेम होते. वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर जगण्यात काही अर्थच उरला नसल्याचे ती वारंवार बोलून दाखवायची. शिवानीची आई आणि मामा नॅपकीनचा कारखाना चालवितात. शिवानीच्या आईने मोठ्या हिमतीने घर सांभाळले होते. त्या शिवानीलाही दिलासा द्यायच्या. शिक्षणात लक्ष देण्याची सूचना करायच्या. शिवानी पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये शिकायची. लॉकडाऊनमुळे ती नागपुरात आली होती. मात्र ती नेहमीच निराश राहायची. या अवस्थेत शुक्रवारी दुपारी २ ते ३.२५ च्या दरम्यान आई कामात गुंतल्याची संधी साधून शिवानीने गळफास लावून घेतला. हे दृश्य दिसताच तिच्या आईने हंबरडा फोडला. त्यानंतर धंतोली पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी शिवानीच्या रूमची तपासणी केली असता इंग्रजीमध्ये लिहिलेली सुसाईड नोट आढळली.आपल्या आत्महत्येला दुसऱ्या कुणालाही जबाबदार धरू नये, असे तिने लिहून ठेवल्याचे पोलीस सांगतात. शिवानीच्या मृत्यूमुळे धंतोलीतील चितळे मार्ग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इंदिरा प्रशांत टेकाडे ( वय ४८) यांनी दिलेल्या सूचनेवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.तरुणाने लावला गळफासकपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमाईनगरमध्ये राहणारा शुभम लालाजी यादव (वय २४) यांनी शुक्रवारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. शुभमच्या वडिलांचे गॅरेज असून तोही गॅरेजमध्ये वडिलांच्या कामात हातभार लावत होता. शुभमचे एकत्रित कुटुंब आहे. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर ११ च्या सुमारास शुभम वरच्या माळ्यावर त्याच्या रूममध्ये गेला. काही वेळानंतर शुभमची बहीण चादर आणायला रूममध्ये गेली असता शुभम गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तिने आईबाबांना सांगितले. त्यांनी शुभमला खाली उतरवून इस्पितळात नेले तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून कपिलनगरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी