शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
3
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
4
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
5
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
6
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
8
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
9
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
10
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
11
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
12
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
13
Test Twenty New Cricket Format : टेस्टमध्ये टी-२० ट्विस्ट! क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटसंदर्भातील रंजक गोष्ट
14
१३ वर्षांच्या मुलीचं बळजबरीने लावलं लग्न, बलात्कार, पतीसह ५ जणांवर गुन्हा, पालघरमधील धक्कादायक घटना 
15
VIRAL VIDEO : दिवाळीच्या फुलबाज्या कशा बनवल्या जातात? फॅक्टरीतला व्हिडीओ होतोय व्हायरल! बघाच...
16
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
17
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
18
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
19
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
20
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली

मतदार ओळखपत्रात चुका; युवकांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:52 IST

१८ वर्षावरील युवकांना निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार नोंदणी करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मोहीम निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आली. शहरातील हजारो युवकांनी अर्ज भरून आपली नावे नोंदविली. मात्र अर्जात अचूक माहिती भरलेली असतानाही अनेकांच्या मतदार ओळखपत्रात चुकीची माहिती नोंदविण्यात आली. यामुळे ओळखपत्र असूनही त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. ओळखपत्रावरील नावातील चुकामुळे युवकात नाराजी आहे.

ठळक मुद्देमतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १८ वर्षावरील युवकांना निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार नोंदणी करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मोहीम निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आली. शहरातील हजारो युवकांनी अर्ज भरून आपली नावे नोंदविली. मात्र अर्जात अचूक माहिती भरलेली असतानाही अनेकांच्या मतदार ओळखपत्रात चुकीची माहिती नोंदविण्यात आली. यामुळे ओळखपत्र असूनही त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. ओळखपत्रावरील नावातील चुकामुळे युवकात नाराजी आहे.विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. सोबतच जनजागृतीही करण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अर्जात विद्यार्थ्याने आपले नाव श्रेयश राजेश कुंभलकर असे नमूद केले असताना श्रेयश या नावांमध्ये घोळ केला. तसेच वडिलांचे नाव राजेश कुंभारे असे नमूद करण्यात आले आहे, अशा तक्रारी इतरही युवकांनी केलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नागपूर शहरातील २५ हजारांहून अधिक युवकांनी प्रथमच अर्ज भरले. मात्र निवडणूक विभागात नवीन अर्जधारकांची माहिती नोंदविताना चुकीची नोंदविण्यात आली आहे. नावात, वडिलांच्या नावात वा आडनावात चुका आहेत. मतदान करताना मतदार कार्डासोबतच ओळखपत्राची गरज असते. अशावेळी आधार कार्ड, पॅन कार्ड यावरील नाव व मतदार ओळखपत्रातील नावात साम्य नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.नावात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू असते. परंतु मतदार यादीतील चुकीची दुुरुस्ती १५ मार्चपूर्वी झाली असती तर त्यांची नावे मतदार यादीत आली असती. त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हकक बजावता आला असता. परंतु आता ही वेळ संपत आहे. तसेच चुकीची दुरुस्ती करण्याचे अनेक जण टाळतात. अशा मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.ओळखपत्र बनविण्यापूर्वी पडताळणी व्हावीमतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आलेल्या अर्जातील मजकूर व बनविण्यात येणाऱ्या ओळखपत्रावरील मजकुराची पडताळणी होण्याची गरज आहे. परंतु पडताळणी होत नसल्याने मतदार ओळखपत्रात चुका राहत असल्याची माहिती युवकांनी दिली.फोटो व मतदार क्रमांकावर मतदान करता येईलमतदार ओळखपत्रात काही चुका असल्या तर त्या दुरुस्तीसाठी बीएलओकडे अर्ज करता येतो. तसेच किरकोळ चुका असल्या तरी ओळखपत्रावर मतदाराचा फोटो आणि मतदान क्रमांक योग्य असला तरी मतदान करता येईल. त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. अशा प्रकारच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर