शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

रेकॉर्डिंग बॉक्समधील डाटा गहाळ?

By admin | Updated: June 12, 2014 01:18 IST

संग्राम बारमधील खूनप्रकरणी अद्याप कोणताही आरोपी पोलिसांना गवसलेला नाही. या बारमधील सीसीटीव्हीला संलग्न असलेल्या रेकॉर्डिंग बॉक्समधील डाटा गहाळ करण्यात आल्याने, आरोपींना हुडकून काढणे

संग्राम बार खून प्रकरण : आरोपी बेपत्ताचनागपूर : संग्राम बारमधील खूनप्रकरणी अद्याप कोणताही आरोपी पोलिसांना गवसलेला नाही. या बारमधील सीसीटीव्हीला संलग्न असलेल्या रेकॉर्डिंग बॉक्समधील डाटा गहाळ करण्यात आल्याने, आरोपींना हुडकून काढणे पोलिसांना मुश्किल होत आहे. १० जूनच्या रात्री १.४५ वाजताच्या सुमारास गाण्याची फर्माईश केल्यावरून पाच-सहा अनोळखी व्यक्तींनी सीताबर्डी येथील सुमित सुरेश तिवारी या तरुणाचा खून करून मोहम्मद रियाज हक याला गंभीररीत्या जखमी केले होते. गैरप्रकार रोखण्यासाठी या बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हाणामारी आणि खुनाची घटना घडताच भाड्याने आॅर्केस्ट्रा फ्लोअर चालविणारा राजू आणि बारचा व्यवस्थापक किशोर यांनी कॅमेऱ्याला संलग्न रेकॉर्डिंग बॉक्स गहाळ केला. वस्तुत: या कॅमेऱ्यात चार बालांचा डान्स, सुरू असलेला धिंगाणा, हाणामारी आणि खुनीहल्ल्याचे चित्रीकरण झाले होते. बॉक्स पोलिसांच्या हाती लागून आपले बिंग फुटेल म्हणून या दोघांनी बारबाला आणि रेकॉर्डिंग बॉक्स गहाळ केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभर पोलिसांनी रेकॉर्डिंग बॉक्सबाबत चौकशी केली असता, राजू आणि किशोर यांनी चक्क आपणाला काहीही माहीत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना बाजीराव दाखवताच त्यांनी बॉक्स आणून दिला. परंतु या बॉक्समधील संपूर्ण डाटा गहाळ करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. बारबालांचा पुरवठा करणारा राजू याने सध्या शहरातील तीन बारमधील आॅर्केस्ट्रा फ्लोअर भाड्याने घेतलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा कमावण्याच्या लालसेने आॅर्केस्ट्राच्या आड तो डान्स फ्लोअरही चालवायचा. राजू याला यापूर्वी बंगलोर, मुंबई, सोनेगाव, सीताबर्डी, प्रतापनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. आॅर्केस्ट्रा फ्लोअर भाड्याने देणे हा परवान्यातील अटींचा भंग आहे. (प्रतिनिधी)