शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात खड्डे एकीकडे, वृक्षारोपण भलतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:20 IST

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असा फतवाही त्यांनी काढला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनीही यासाठी चांगलाच घाम गाळला. सर्वत्र उत्तम काम झाले असले तरी भिवापूरच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र विभागाने ‘खड्डे एकीकडे अन् वृक्षारोपण भलतीकडे’ असा ...

ठळक मुद्देसामाजिक वनीकरण विभागाचा अजब कारभार  ग्रामस्थांमध्ये चर्चांना उधाण

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असा फतवाही त्यांनी काढला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनीही यासाठी चांगलाच घाम गाळला. सर्वत्र उत्तम काम झाले असले तरी भिवापूरच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र विभागाने ‘खड्डे एकीकडे अन् वृक्षारोपण भलतीकडे’ असा अफलातून कारभार केल्याचे विचित्र चित्र दृष्टिक्षेपास पडत आहे. भिवापूर तालुक्यातील गोंडबोरी शिवारात हा प्रकार झाला असून यावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.तालुक्यातील गोंडबोरी फाटा ते गोंडबोरी अशा सुमारे दोन किमी अंतरापर्यंत खड्डे तयार करण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. वनविभागाच्या वतीने हजारावर खड्डे तयारही झाले. याकामासाठी लाखो रुपयांचा खर्च शासनाच्या तिजोरीतून करण्यात आला. ‘एकच लक्ष्य, १३ कोटी वृक्ष’, ‘माझे वृक्ष, माझे जीवन’ अशी सादही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घातली. त्यानंतर वाजतगाजत वृक्षदिंडी काढत सर्वत्र वृक्षारोपणाचा जल्लोष दिसून आला. सर्वत्र अत्यंत गंभीरतेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आटोपला. असे असले तरी गोंडबोरी शिवारात ‘वृक्ष छोटे आणि खड्डे मोठे’असे चित्र दिसून आले.यामुळे सदर भागात मोठा खर्च करीत तयार केलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण न करता जवळच दुसरा खड्डा नव्याने तयार करीत कसेबसे उरकवण्यात आले.

आॅन दि स्पॉट चौकशीगोंडबोरी फाटा ते गोंडबोरी सुमारे दोन किमी अंतरापर्यंत साधारणत: दोन बाय दोनचे हे खड्डे तयार केल्यानंतरही याठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली नाही. बाजूलाच कसातरी दुसरा खड्डा तयार करीत त्यात वृक्षारोपण करण्यात आले. नियमाप्रमाणे केलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करायचेच नव्हते तर शासनाचे लाखो रुपये या उपक्रमात खर्च का करण्यात आले, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. सोबतच याप्रकरणाची ‘आॅन दि स्पॉट’ उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आहे.

 

 

 

टॅग्स :agricultureशेती