शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘पेसो’ अधिकाऱ्याच्या घरातून आढळली गैरकारभाराची कागदपत्रे; ‘मिडलमॅन’ देशपांडेकडे सोन्याची बिस्कीटे, चांदीचे दागिने

By योगेश पांडे | Updated: January 5, 2024 16:27 IST

सीबीआयच्या पथकाने आरोपींच्या घराची कसून तपासणी केली व एका अधिकाऱ्याच्या घरातून या प्रकरणासोबत इतर काही बाबींशी निगडीत गैरकारभाराची कागदपत्रे सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

योगेश पांडे नागपूर : राजस्थानच्या एका केमिकल कंपनीला अतिरिक्त डेटोनेटर्स बनविण्याची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या ‘पेसो’च्या (पेट्रोलियम ॲँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केल्यानंतर खळबळ उडाली आहे. सीबीआयकडून या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सखोल तपास सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने आरोपींच्या घराची कसून तपासणी केली व एका अधिकाऱ्याच्या घरातून या प्रकरणासोबत इतर काही बाबींशी निगडीत गैरकारभाराची कागदपत्रे सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील सुपर शिवशक्ती केमिकल्स प्रा.लि. या कंपनीचे संचालक देविसिंग कच्छवाह यांच्या कंपनीला मार्च २०२४ पर्यंत त्यांच्या डेटोनेटर्स उत्पादनाची क्षमता ७५ टक्क्यांपर्यंत वापरायची होती. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीसाठी ‘पेसो’चे उपमुख्य नियंत्रक अशोक दलेला व विवेक कुमार या दोन अधिकाऱ्यांनी १० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. हा व्यवहार प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लेक व्ह्यू अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) याच्या माध्यमातून होणार होता. सीबीआयच्या पथकाने लाच घेताना चारही आरोपींना रंगेहाथ पकडले व चौघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर सीबीआयच्या पथकाने देशपांडे व दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यालय व निवासस्थानाची झडती घेतली. एका अधिकाऱ्याच्या घरातून सीबीआयच्या पथकाला या व्यवहारात आरोपींचा गुन्हा उघडकीस आणणारी कागदपत्रे सापडली. तर देशपांडेच्या घरातून १.१९ कोटींचा मुद्देमाल सापडला. त्यात मोठ्या प्रमाणावर रोकड तर होतीच. शिवाय सोन्याची बिस्कीटे, चांदीचे दागिने व ‘पेसो’च्या कामकाजाशी निगडीत कागदपत्रेदेखील होती. देशपांडे हा ‘पेसो’चा कर्मचारीदेखील नसताना त्याच्याकडे कार्यालयीन कागदपत्रे आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘पेसो’मध्ये आणखी ‘लिंक्स’ ?

चारही आरोपींना शनिवारपर्यंत कस्टडी सुनावण्यात आली असून शुक्रवारीदेखील त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. ‘पेसो’चे राष्ट्रीय पातळीवर मोठे महत्त्व आहे. स्फोटकांशी निगडीत कारखान्यांशीच थेट संबंध येत असल्याने प्रत्येक परवानगी सखोल तपासणीनंतरच दिली जाते. अशा स्थितीत पैशांच्या बदल्यात उत्पादनक्षमता वाढविण्याची परवानगी देण्याचा हा प्रकार याअगोदरदेखील झाला आहे का व ‘पेसो’त या लाच रॅकेटच्या आणखी ‘लिंक्स’ आहेत का याचा शोध सुरू आहे.