शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय बदल्यांमध्ये गैरप्रकार : इंटकची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:24 IST

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) नागपूरसह राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील (मेडिकल) तृतीय श्रेणी संवर्गातील १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) केली आहे. मेडिकल प्रशासनाने या संदर्भात पुढील योग्य कार्यवाहीस्तव ‘डीएमईआर’ला पत्र दिले आहे.

ठळक मुद्देमेडिकलने कार्यवाहीसाठी वरिष्ठांना दिले पत्र

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) नागपूरसह राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील (मेडिकल) तृतीय श्रेणी संवर्गातील १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) केली आहे. मेडिकल प्रशासनाने या संदर्भात पुढील योग्य कार्यवाहीस्तव ‘डीएमईआर’ला पत्र दिले आहे.‘डीएमईआर’ने पारदर्शक बदल्या करण्याच्या नावावर नागपुरातील मेडिकल, मेयो व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना बदलीनंतरचे पसंतीक्रम विचारले. उपराजधानीतील तिन्ही संस्थांमध्ये मोठ्या संख्येने ही पदे रिक्त आहेत. त्यावर या कर्मचाऱ्यांची बदली देण्याबाबत उत्सुकता दर्शवली. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाकडे ही माहिती गेल्यावर कर्मचाऱ्यांना पसंतीक्रम वगळून नागपूरच्या बाहेर मुंबईसह, गोंदिया, चंद्रपूर व इतरत्र बदल्यांचे आदेश काढण्यात आले. राज्यातील इतरही काही संस्थेत हाच प्रकार घडला. या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही दलालांकडून उपराजधानीतील कर्मचाऱ्यांकडे विचारणा झाल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या तक्रारीला घेऊन विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्रिशरण सहारे यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना निवेदन सादर केले. या निवेदनाला घेऊन डॉ. निसवाडे यांनी हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी ‘डीएमईआर’ला पाठविले आहे. झालेल्या बदल्या रद्द होणार की कायम राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.बदल्या रद्द न झाल्यास आंदोलन‘डीएमईआर’ने पारदर्शक बदल्यांच्या नावावर नियमबाह्य बदल्या केल्या आहेत. या बदल्या रद्द न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, सोबतच न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येईल.त्रिशरण सहारेअध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना

टॅग्स :doctorडॉक्टरGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय