शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 10:28 IST

देवदर्शनाच्या बहाण्याने मुलीच्या (वय १६) आईवडिलांना मंदिरात सोडल्यानंतर मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर एका आरोपीने बलात्कार केला.

ठळक मुद्देदेवदर्शनाच्या बहाण्याने पालकांना मंदिरात सोडले रामटेक-मनसर दरम्यानची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवदर्शनाच्या बहाण्याने मुलीच्या (वय १६) आईवडिलांना मंदिरात सोडल्यानंतर मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर एका आरोपीने बलात्कार केला. आपल्या पापाची वाच्यता दुसऱ्या कुणाकडे केल्यास जीवे ठार मारेन,अशी धमकीही दिली. विशेष म्हणजे, आरोपी वैदू (जडीबुटी विकणारा) असून, मुलगी त्याला मामा म्हणायची. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या संतापजनक प्रकरणात पोलिसांनी बलात्कार तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला.अमर मुन्नालाल गौर (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील योगी अरविंदनगरात (पांडे मोहल्ला) राहतो. तो जडीबुटी विकतो आणि अनेक रोगावर उपचार करण्याचा दावा करतो. परिसरातील लोक त्याला वैदू म्हणून ओळखात. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसोबत त्याचे चांगले संबंध होते. पीडित मुलीची आई त्याला भाऊ तर मुलगी मामा म्हणायची. या संबंधातून त्याचे मुलीच्या घरी येणे-जाणेही होते. काही दिवसांपूर्वी मुलीला पोटात दुखणे सुरू झाल्याने पालकांनी तिला डॉक्टरकडे दाखवले. त्यांनी किडनी स्टोनचा संशय व्यक्त केल्यानंतर पालकांनी आरोपी गौरला दाखवले. त्याने हमखास उपचार करतो, अशी बतावणी केली. त्यानंतर २० मार्चला दुपारी ३ वाजता त्याने पीडित मुलीला आणि तिच्या पालकांना रामटेकला दर्शनाला जाऊ असे सांगून आपल्या कारमध्ये बसविले. आईवडिलांना मंदिरात सोडल्यानंतर त्याने पीडित मुलीला किडनी स्टोनच रिपोर्ट घेऊन येऊ असे म्हणत कारमध्ये बसविले. तिला मनसर ते रामटेक मार्गावरील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिला एका रुममध्ये नेऊन एक उपकरण दाखवले. तुझ्या किडनी स्टोनची तपासणी करायची आहे, असे म्हणत त्याने तिला कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मुलीने विरोध केला असता तिला मारहाण करून कुणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्याने परत आणून सोडल्यानंतर मुलीने आपल्या पालकांना ही माहिती दिली.

पालकांना धक्कानातेवाईकासारखा मानपान करणाऱ्या आरोपीने अशाप्रकारे विश्वासघात करून मुलीचे भविष्य धोक्यात आणल्याने पालकांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांनी मुलीला घेऊन जरीपटका पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार