शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 21:40 IST

लग्नाचे आमिष देऊन एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने बदनामीच्या भीतीमुळे कुटुंबीयांनी मौन पाळले. परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देमुलाला दिला जन्म : पोलिसांनी दाखल केला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्नाचे आमिष देऊन एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने बदनामीच्या भीतीमुळे कुटुंबीयांनी मौन पाळले. परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास कोतवाली पोलिसांकडे सोपविला आहे. शुभम कृष्णाजी सोनुले (२३) असे आरोपीचे नाव आहे.शुभम हा कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत राहतो. पीडित मुलगी सध्या १८ वर्षाची आहे. ती शुभमच्या घरासमोर राहत होती. अत्याचाराची घटना जुलै २०१७ च्या पूर्वीची आहे. पोलीस सूत्रानुसार शुभमने अल्पवयीन विद्यार्थिनीस लग्नाचे आमिष दाखवून आपल्या घरी तिच्यावर अत्याचार केला. मुलीने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. जुलै २०१७ मध्ये ती नाशिकला शिकण्यासाठी गेली. तिथे गेल्यावर काही दिवसानंतर ती गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मुंबईत राहणाऱ्या तिच्या आईच्या मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. तिने मुलीच्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात केवळ आई आहे. सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे तिच्या आईने ही गोष्ट लपवून ठेवली. परंतु शिकत असलेली मुलगी लग्न न करताच दिवस गेल्याची गोष्ट जास्त दिवस लपून राहू शकली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार पोलिसांकडे गेला. मुंबईतील भोईवाडा ठाण्यात बयाण नोंदवण्यात आले. तेव्हा दोन्ही बाजूंकडून तक्रार नोंदवण्याबाबत नकार देण्यात आला. त्यामुळे पोलिसांनीही कुठलेही पाऊल उचलले नाही.दरम्यान २७ जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला. यानंतर सामाजिक संस्था आणि बाल संरक्षण समितीला या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी पीडित मुलगी आणि आईची भेट घेतली. यानंतर मुंबई पोलिसांनीही गुन्हा दाखल करून प्रकरण कोतवाली पोलिसांकडे तपास स्थानांतरित केला. या प्रकरणाचा तपास हवालदार दीपक लांजेवार करीत आहेत.मुलीसह मुलाचीही जबाबदारीया घटनेमुळे अल्पवयीन मुलीचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. आई खासगी काम करून घर चालवते. मुलीला नोकरी लागली तर दिवस फिरतील म्हणून तिने मुलीला व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी नाशिकला शिकण्यासाठी पाठवले होते. आता आईवर मुलगी व तिच्या मुलाचीही जबाबदारी आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRapeबलात्कार