शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:52 IST

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना हिंगणा पोलिसांच्या हद्दीतील आहे.प्रवीण सूर्यभान गुबे (५०) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १ फेब्रुवारी २०१६ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ६ वर्षे वयाची होती. आरोपी व मुलगी एकाच वस्तीत रहात होते. त्यामुळे ते एकमेकांना चांगले ओळखत होते. आरोपीने त्याचा फायदा घेतला. दुपारी ४ च्या सुमारास आरोपीने मुलीला स्वत:च्या मोटरसायकलवर बसवून निर्जन ठिकाणी नेले व तेथे मुलीवर अत्याचार केला. हिंगणा पोलीस ठाण्यात त्याची तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. खडके यांनी प्रकरणाचा तपास केला. पोलीस हवालदार अनिल रघटाटे व अशोक जनबंधू यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिजे. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. आसावरी पळसोदकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Rapeबलात्कारDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय