शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रेमभंगामुळे अल्पवयीन मुलीचे आत्मघाती पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 20:48 IST

प्रेमभंग झाल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देविष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न : पोलीस चौकशीतून उलगडा : सदरमध्ये प्रियकर गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेमभंग झाल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या या आत्मघाती पावलामुळे तिच्या अल्पवयीन प्रेमकथेचा तसेच विनयभंगाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला अन् पोलिसांनी एका ओला चालकाला अटक केली. काहीशी नाट्यमय वाटणारी ही घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.दर्शन श्रीवास्तव (वय २६) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो सदरमध्ये अवस्थी चौकाजवळ भाड्याच्या खोलीत राहतो. त्याला आईवडील नाही. तो ओला चालवतो. तक्रार करणारी युवती (वय १७) सध्या ११ वीत शिकते. ती वर्षभरापूर्वी दर्शनच्या घराशेजारी राहायची. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. त्यातून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध झाले. जून महिन्यात एके दिवशी दुपारी २ च्या सुमारास ती ओठावर उपचार करून घेण्यासाठी मेयोत गेली होती. परत येताना दिला दर्शन ऑटोस्टॅण्डजवळ दिसला. घरी सोडून देतो, असे सांगून त्याने तिला आपल्या कारमध्ये बसविले. इकडे-तिकडे फिरविल्यानंतर सायंकाळी ते कस्तूरचंद पार्कजवळ आले. तेथे त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर तिला तेथेच उतरवून देत तो पुढे निघून गेला आणि ती स्टार बसने घरी आली. रात्री ती नळावर पाणी भरत असताना पुन्हा दर्शन तिच्याजवळ आला आणि त्याने तिला पुन्हा आपल्या कारमध्ये बसवून बाहेर नेले. पुन्हा अंधाऱ्या ठिकाणी जाऊन त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले आणि निघून गेला. त्यानंतर ते दोघे प्रेमीयुगुलासारखे वागू लागले. १५ ऑगस्टला ती दर्शनच्या घरी गेली आणि तिने त्याला लग्नाची गळ घातली. त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. प्रेमभंग झाल्यामुळे ती क्षुब्ध झाली अन् तिने घरी परतल्यानंतर विषारी औषध प्राशन केले. तिला मेयोत दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर आईवडिलांनी तिला आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण विचारले, मात्र तिने कुणालाच काही सांगितले नाही. दरम्यान, डॉक्टरांकडून मिळालेल्या सूचनेनुसार सदर पोलीस मेयोत पोहचले. त्यांनी युवतीचे बयाण नोंदविताना तिला आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण विचारले. तिला विश्वासात घेऊन बोलते केले असता, तिने प्रियकराने लग्नास नकार दिल्याने आत्मघाती पाऊल उचलल्याचे पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट