शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्यास सात वर्षे कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:22 IST

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षीय बालिकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या  वडीलतुल्य इसमाला लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याचे (पोक्सो) विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देनागपूरच्या पोक्सो विशेष न्यायालयाचा निकालजरीपटका भागातील घटनापितातुल्य इसमाचे घृणीत कृत्य

आॅनलाईन लोकमतनागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षीय बालिकेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या  वडीलतुल्य इसमाला लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याचे (पोक्सो) विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विनोद गुलाब डोंगरे (३०), असे आरोपीचे नाव आहे.प्रकरण असे की, विनोद डोंगरे याचे कुटुंब पीडित मुलीच्या शेजारीच राहायचे. पीडित मुलीचे आई-वडील नोकरी व व्यवसायानिमित्त सकाळी घराबाहेर पडून उशिरा रात्री घरी परतायचे. घरी येण्यास उशीर होत असल्याने आणि विनोद डोंगरे याच्यावर विश्वास असल्याने त्यांनी मुलीला ‘विनोद अंकल’च्या घरी खेळण्यास सांगितले होते.ही दुर्दैवी घटना २१ डिसेंबर २०१४ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली होती. त्यावेळी ती घरी एकटीच होती. विनोदने तिच्या घरात घुसून आधी जेवण मागितले होते आणि त्यानंतर तिच्याशी अश्लील कृत्य केले होते. यापूर्वीही त्याने असा प्रकार केला होता. घटना घडत असताना शेजारी महिलेने पीडित मुलीच्या वडिलांना मोबाईलवर संपर्क करून घरी बोलावले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी या नराधमास झोडपले होते. वडिलांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३७६(२)आणि पोक्सोच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती.महिला पोलीस उपनिरीक्षक एस. डब्ल्यू. किन्नाके यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३७६ (१) कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम ८ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील दीपिका गवळी, आरोपीच्या वतीने अ‍ॅड. शेख शाबाहत यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल सुरेश शेंडे आणि नायक पोलीस शिपाई योगेश डबले यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.

 

 

 

 

टॅग्स :Rapeबलात्कार