शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

लोकायुक्तांच्या कक्षेत मंत्री; मात्र कारवाईची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 06:59 IST

प्रशासन आणि सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी कठोर लोकायुक्त कायदा आणण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने अधिवेशनाच्या आधी केली होती.

दीपक भातुसेनागपूर : प्रशासन आणि सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी कठोर लोकायुक्त कायदा आणण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने अधिवेशनाच्या आधी केली खरी, मात्र या कायद्यात असलेल्या अटी पाहिल्या तर कुठलेही प्रकरण तडीस जाईल अशी शक्यता दिसत नाही. दुसरीकडे एखाद्या तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आल्यास तक्रारदारावर कारवाई करण्याचे अधिकार देणारी तरतूद या कायद्यात आहे.

राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या कायद्यात मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी, पोलिस, वन सेवेतील अधिकारी, राज्य सरकारी कर्मचारी, स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य, शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळे, प्राधिकरण यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात आले आहे. 

या कायद्यानुसार राज्यातील जनतेला यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार थेट लोकायुक्तांकडे करता येणार आहे. एखाद्या लोकसेवकाविरोधातील तक्रारीत प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्यास संबंधिताचा खुलासा घेऊन नंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे तसेच त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्याची मुभा लोकायुक्तांना देण्यात आली आहे.  

लोकायुक्तांपुढे कोणते अडथळे लोकायुक्तांकडे मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आल्यास चौकशी सुरू करण्यापूर्वी विधानसभेच्या दोन तृतीयांश सदस्यांची मान्यता असेल तरच चौकशी करता येणार आहे. विधिमंडळाने मान्यता दिल्यानंतरही पाच लोकायुक्तांच्या खंडपीठाची मान्यता लागेल. 

तसेच मुख्यमंत्र्यांविरोधातील तक्रार राज्याच्या अंतर्गत सुरक्षेशी किंवा सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित असेल तरच लोकायुक्तांना चौकशी करता येणार असून अन्य तक्रारींची दखल घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांविरोधातील चौकशी पूर्णपणे गोपनीय असेल.    

मंत्र्यांच्या बाबतीत मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतरच संबंधित मंत्र्यावरील आरोपांची चौकशी करण्याची लोकायुक्तांना मुभा असेल. सनदी अधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांची, आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापतींची तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांबाबत संबंधित विभागाचा सचिव आणि मंत्र्यांची पूर्व मान्यता घ्यावी लागणार आहे. 

चौकशीच्या परवानगीसाठी तीन महिन्यांचा अवधी 

  • चौकशीला परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय घेण्यासाठी संबंधितांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 
  • पूर्व मान्यता मिळाली नाही तर लोकायुक्तांना चौकशी करता येणार नाही. तीन वर्षांच्या आतील प्रकरणांचीच तक्रार घेता येईल किंवा तीन वर्षांपेक्षा अधिक काळातील प्रकरणांची, आरोपांची चौकशी करता येणार नाही. 
  • न्यायप्रविष्ट किंवा विधिमंडळाच्या कोणत्याही समितीपुढे सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये लोकायुक्तांना दखल देता येणार नाही.  

तक्रार खोटी ठरल्यास एक वर्षाचा कारावास  या कायद्यानुसार लोकसेवकाविरोधात तक्रार करण्याची कोणालाही अगदी एखाद्या कैद्यालाही मुभा देण्यात आली आहे. मात्र ही तक्रार खोटी ठरल्यास संबंधितास एक वर्षाचा कारावास आणि दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. ज्या लोकसेवकाविरोधात खोटी तक्रार केली आहे, त्याला नुकसानभरपाई आणि खटल्याचा खर्चही तक्रारदारालाच करावा लागणार आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन