शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमहोदय, नंबरच बंद आहे, कुठे करायची तक्रार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरचा वीज पुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलाय, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरचा वीज पुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलाय, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन नाही. अखेर आपण महावितरणच्या वेबसाईटवर जातो. तिथं ठळकपणे दिलेले संपर्क क्रमांक पाहून आपण भलतेच खूश होतो. फोन लावतो; मात्र पलीकडून ऐकायला मिळते, ‘या क्रमांकाची इनकमिंग सेवा बंद करण्यात आली आहे.’ ऐकून आपले अवसान गळते, गप्प बसण्याशिवाय दुसरे असते तरी काय? हा प्रकार आहे महावितरणचा ! आश्चर्य म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशावरूनच हे संपर्क क्रमांक वेबसाईटवर टाकलेले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी महावितरणला हे दोन क्रमांक उपलब्ध करून दिले होते. यातील एक लॅन्डलाइनचा क्रमांक (०२२-४१०७८५००) आहे. वीज गेल्यावर मिस कॉल देऊन या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे महावितरणचेच आवाहन आहे; मात्र त्यावर इनकमिंग कॉल बंद असल्याची माहिती मिळते. याच प्रकारे ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस करण्याचेही आवाहन आहे. मात्र एमएसएम पाठविल्यावर कसलाही प्रतिसाद मिळत नाही. संपर्क सेवाही बंद आहे.

...

बिल न भरल्याने सेवा खंडित

महावितरणचे अधिकारी या संदर्भात काहीच सांगत नाहीत. मात्र, मोबाईल आणि टेलिफोनचे बिल न भरल्याने ही सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी तर तक्रारकर्त्यांच्या वारंवार येणाऱ्या कॉलचा त्रास वाचविण्यासाठी मुद्दामहून इनकमिंग कॉल बंद करून ठेवण्यात येत असल्याचा प्रकार घडत होता.

...

सेवा बंद असतानाही वेबसाईटवर नंबर कशाला?

महावितरणचे कार्यकारी संचालक (बिलिंग) उदय गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा लॉकडाऊनच्या प्रारंभाला दिली होती. फक्त वाणिज्य आणि औद्योगिक सेवा असणाऱ्या ग्राहकांसाठी हे क्रमांक उपलब्ध होते. मात्र, आता ही सेवा बंद आहे.