शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमहोदय, नंबरच बंद आहे, कुठे करायची तक्रार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरचा वीजपुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलाय, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरचा वीजपुरवठा बऱ्याच वेळापासून बंद पडलाय, आपण फार वैतागलेले आहोत. तक्रारीचे कसलेही साधन नाही. अखेर आपण महावितरणच्या वेबसाईटवर जातो. तिथ ठळकपणे दिलेले संपर्क क्रमांक पाहून आपण भलतेच खूश होतो. फोन लावतो, मात्र पलीकडून ऐकायला मिळते, ‘या क्रमांकाची इनकमिंग सेवा बंद करण्यात आली आहे.’ ऐकून आपले अवसान गळते, गप्प बसण्याशिवाय दुसरे असते तरी काय? हा प्रकार आहे महावितरणचा ! आश्चर्य म्हणजे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशावरूनच हे संपर्क क्रमांक वेबसाईटवर टाकलेले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी महावितरणला हे दोन क्रमांक उपलब्ध करून दिले होते. यातील एक लॅन्डलाईनचा क्रमांक (०२२-४१०७८५००) आहे. वीज गेल्यावर मिस कॉल देऊन या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे महावितरणचेच आवाहन आहे. मात्र त्यावर इनकमिंग कॉल बंद असल्याची माहिती मिळते. याच प्रकारे ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस करण्याचेही आवाहन आहे. मात्र एमएसएम पाठविल्यावर कसलाही प्रतिसाद मिळत नाही. संपर्क सेवाही बंद आहे.

...

बिल न भरल्याने सेवा खंडित

महावितरणचे अधिकारी या संदर्भात काहीच सांगत नाहीत. मात्र, मोबाईल आणि टेलिफोनचे बिल न भरल्याने ही सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी तर तक्रारकर्त्यांच्या वारंवार येणाऱ्या कॉलचा त्रास वाचविण्यासाठी मुद्दामहून इनकमिंग कॉल बंद करून ठेवण्यात येत असल्याचा प्रकार घडत होता.

...

सेवा बंद असतानाही वेबसाईटवर नंबर कशाला?

महावितरणचे कार्यकारी संचालक (बिलिंग) उदय गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा लॉकडाऊनच्या प्रारंभाला दिली होती. फक्त वाणिज्य आणि औद्योगिक सेवा असणाऱ्या ग्राहकांसाठी हे क्रमांक उपलब्ध होते. मात्र, आता ही सेवा बंद आहे.