शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नागपुरात आपली बसच्या ताफ्यात मिनीबसचा समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 20:51 IST

नागपुरातील वस्त्यांतील अरुंद रस्त्यावर आपली बस धावावी आणि प्रवाशांना सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाने आपली बसच्या ताफ्यात सहा मिनीबसचा समावेश केला आहे. मंगळवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या बसचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर मान्यवरांनी पारडी आणि बर्डी या मार्गावर धावणाऱ्या मिनीबसमधून प्रवास केला.

ठळक मुद्देकृष्णा खोपडे यांच्या हस्ते सहा बसचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील वस्त्यांतील अरुंद रस्त्यावर आपली बस धावावी आणि प्रवाशांना सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाने आपली बसच्या ताफ्यात सहा मिनीबसचा समावेश केला आहे. मंगळवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या बसचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर मान्यवरांनी पारडी आणि बर्डी या मार्गावर धावणाऱ्या मिनीबसमधून प्रवास केला.सतरंजीपुरा चौक येथे आयोजित कार्यक्रमाला स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, सदस्य नितीन साठवणे, संजय महाजन, झोन सभापती अभिरुची राजगिरे, समिता चकोले, नगरसेविका मनीषा कोठे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपुरडे, बस आॅपरेटर ट्रॅव्हल टाईमचे सदानंद काळकर, आर.के.सिटीचे नीलमणी गुप्ता, हंसा ट्रॅव्हल्सचे जे.पी. पारेख, डीम्सचे टीम लीडर सूर्यकांत अंबाडेकर आदी उपस्थित होते.शहरातील खासगी वाहतूक कमी व्हावी यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम बनविण्याचा प्रयत्न महापालिका आणि स्थानिक नेतृत्वाच्या वतीने होत आहे. मुख्य रस्त्यांसोबतच अनेक वस्त्यांमधील लहान रस्त्यांवर असलेल्या लोकांनाही आपली बसची सेवा मिळावी या हेतूने मिनीबस आता परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. अशा आणखी बसेस आणण्याचा मानस असल्याचे कृष्णा खोपडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.बंटी कुकडे म्हणाले, परिवहन सेवा पर्यावरणपूरक करण्याचा विभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने परिवहन समितीचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थसंकल्पातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे. ‘चलो अ‍ॅप’च्या माध्यमातून परिवहन सेवा अधिकाधिक लोकाभिमुख बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांसाठी लवकरच तेजस्विनी बसेस धावणार आहेत. लोकांनी या सेवेचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूकKrushna Khopdeकृष्णा खोपडे