शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमचा महाविकास आघाडीला सोमवारपर्यंत ‘अल्टिमेटम’

By आनंद डेकाटे | Updated: September 7, 2024 18:04 IST

इम्तियाज जलील : महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्याच भ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ द्यायचे नाही, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे एमआयएमने महाविकास आघाडीला युतीबाबतचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर चर्चाही झाली. परंतु, आघाडीच्या नेत्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आहे. निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे येत्या ९ सप्टेंबरपर्यंत महाविकास आघाडीने निर्णय जाहीर करावा, असा ‘अल्टिमेटम’ एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी येथे पत्रपरिषदेत दिला. सोमवारी पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी हे संभाजीनगर येथे येत आहेत. त्यावेळी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एमआयएमच्या विदर्भ महिला कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रपरिषदेत बोलत होते. इम्तियाज जलील म्हणाले, आमच्या पक्षाची जितकी ताकद आहे, तितक्याच जागा आम्ही मागणार आहोत. अद्यापही जागांबाबत चर्चा झालेली नाही. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखणे महत्त्वाचे आहे, त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला आहे.

परंतु एमआयएमची राजकीय ताकद नाही, असा संदेश कदाचित ते देऊ इच्छितात. महाविकास आघाडीचे नेते अजूनही लोकसभा निवडणुकीच्याच भ्रमात आहेत. मात्र हा भ्रम विधानसभा निवडणुकीत तुटेल, असा दावाही त्यांनी केला.

रामगिरी महाराजांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्या, त्यांच्या जिवाला धोकारामगिरी महाराज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आ. नितेश राणे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आहे. त्यामुळे ते दोघेही मुस्लीमांविरोधात उघडपणे वक्तव्य करीत आहेत. भाजपचे सरकार सत्तेत येण्यासाठी ते काहीही करू शकतात. रामगिरी महाराज यांच्या जिवाला धोका आहे. त्यांची हत्या करून मुस्लीमांना बदनाम केले जाऊ शकते, असा आरोप करीत रामगिरी महाराज यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी केली.

टॅग्स :nagpurनागपूर