शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मिल मजुराने बांधली दीक्षाभूमीवर विहीर

By admin | Updated: October 21, 2015 03:11 IST

कसल्याही पद्धतीच्या सुखदु:खाची चिंता न करता आंबेडकरी चळवळीसाठी कष्ट उपासणाऱ्यांची संख्या कमी नाही.

भागरथीबाई नंदेश्वर : मजुरीसोबतच बांगडी, कुंकू विकून उभा केला होता पैसासुमेध वाघमारे  नागपूर कसल्याही पद्धतीच्या सुखदु:खाची चिंता न करता आंबेडकरी चळवळीसाठी कष्ट उपासणाऱ्यांची संख्या कमी नाही. यातीलच एक भागरथीबाई नंदेश्वर. एम्प्रेस मिलमध्ये कामगार म्हणून असलेल्या भागरथीबाईने मानवी सन्मानाच्या मार्गातील अवरोध म्हणजे विषमतेला कडाडून विरोध करीत जनमानसात बाबासाहेबांचे विचार पेरले. त्याकाळी पोटाला चिमटा देत पै-पै करून जमवलेल्या पैशातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या लोकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने विहीर बांधून दिली.'मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही', अशी गर्जना करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली लाखो दलित बांधवांसह बौद्ध धम्म स्वीकारला. या ऐतिहासिक क्रांतीने दलितांना स्वत्व आणि सत्त्व दोन्हीही दिलं. कर्मविपाकाच्या गाळात रुतलेल्या शोषितांच्या लढ्याला बळ दिलं. जगायला प्रयोजन दिलं. म्हणूनच भागरथीबाईसारख्या अनेक महिलांनी चळवळीच्या निखाऱ्यावर जळत, अपेक्षा न बाळगता समाजासाठी होईल ती मदत केली.नागपुरातील खलासी लाईन येथे राहणाऱ्या भागरथीबाई एम्प्रेस मिलमध्ये कामगार होत्या. त्याकाळचे प्रसिद्ध दलित समाज सुधारक किसन फागू बनसोडे आणि जाईबाई चौधरी यांच्याशी त्यांची ओळख होती. यांच्या प्रभावातूनच त्या दलित चळवळीशी जुळल्या. आपल्या कामगार वस्तीतील अस्पृश्यांच्या वाईट चालीरीतींचा विरोध करून त्या टाकून देण्याचे त्या नेहमीच उपदेश द्यायच्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धम्माने भागीरथीबाई प्रभावित झाल्या होत्या. समाजाला आपलेही काही देणं लागते म्हणून मोठ्या कष्टाने जमा केलेल्या पैशातून दीक्षाभूमीवर विहीर बांधून दिली. हा पैसा त्यांनी मिलमधील कामासोबतच बांगडी, कुंकू, शिकेकाई विकून उभा केला होता. तसेच भदंत आनंद कौसल्यायन याच्या बुद्धभूमीला जमीन विकत घेण्यासाठी म्हणून त्याकाळी ६०० रुपयांची देणगी दिली. त्याकाळी बाईने बांगड्याचा व्यवसाय करणे नवलाईचा विषय होता. पण महिला भागरथीबाईकडूनच बांगड्या भरून घेत, मात्र त्या बांगड्या भरून घेतल्यानंतर आंघोळ करून घेत असत. समाजातील पोटजाती, भेद नाहिसे व्हावे याकरिता भागरथीबाईंनी आपल्या मुलींचे विवाह इतर पोटजातीमध्ये केले. अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या भागरथीबाईनी शेवटपर्यंत विषमतेच्या वाळवंटात समतेची कारंजी फुलविण्याचा प्रयत्न केला. विदर्भातील दलित चळवळीचा (डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत) शोध आर.एस.मुंडले धरमपेठ कॉलेजच्या समाजशास्त्राचे विभाग प्रमुख मोहन भानुदास नगराळे हे घेत आहेत. भागरथीबाई नंदेश्वर यांच्याबद्दलची ही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.