शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

दूध पिताय की विष?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:41 IST

दुधातील भेसळीचे प्रमाण देशात ८८.२ टक्के इतके आहे. सर्वेक्षणातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. प्रयोगशाळा चाचणीतही ६८.७ टक्के दूध पिण्यास योग्य नसल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्दे८८.२ टक्के दुधात भेसळ : नागपुरात जास्तीचे दूध येतय कुठून ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुधातील भेसळीचे प्रमाण देशात ८८.२ टक्के इतके आहे. सर्वेक्षणातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. प्रयोगशाळा चाचणीतही ६८.७ टक्के दूध पिण्यास योग्य नसल्याचे आढळून आले आहे. नागपूरचा विचार करता येथील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिमाणसी दुधाचे उत्पादन १५० ग्रॅम आहे तर मागणी ४३३ ग्रॅम इतकी आहे. तरीही दुधाचा पुरवठा व्यवस्थित होत असल्याचा दावा केला जातो. मग मागणी जास्त आणि उत्पादन कमी असताना नागपुरात येणारे दूध येतय तरी कुठून? कारण ज्या गुजरात आणि आंध्र प्रदेशातून दूध येथे येत असल्याचा दावा केला जात असला तरी या राज्यात दुधाचे उत्पादन फार कमी आहे. ते त्यांचीच गरज भागवू शकत नाही. मग नागपुरातील दूध निश्चितच भेसळयुक्त आहे. हे विषारी दूध कॅन्सरसारख्या आजाराला निमंत्रण देणारे असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय जीवजंतु कल्याण मंडळाचे (अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड) सदस्य मोहन सिंग अहलुवालिया यांनी केला.रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत अहलुवालिया यांनी देशभरातील बाजारपेठेत भेसळयुक्त दूध विकल्या जात असल्याचा दावा केला. विदर्भात मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ केली जात आहे. स्थानिक शेतकरी आणि पशुपालकांना दुधाला प्रतिलिटर १८ ते २७ रुपये भाव दिला जात आहे. मात्र हेच दूध शहरात ५० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. गाई-म्हशींची संख्या सातत्याने कमी होत आहे. नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे. पर्यायाने दुधाची मागणीही वाढली आहे. असे असतानाही मुबलक प्रमाणात दूध उपलब्ध असल्याचे भासवले जात असले तरी ते दूध शुद्ध नसून भेसळयुक्त आहे. या क्षेत्रात काम करणाºया उद्योगपतींकडून दूध उत्पादकांना कमजोर बनविण्यात आले आहे. हीच अवस्था राज्य दुग्ध व्यवसाय महामंडळाची झाली आहे.दूध उत्पादकांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारला राष्ट्रीय मूल्य दूध योजनेसारखे धोरण आखण्याची गरज आहे. त्यामुळे पशुपालकांना दुधाचा योग्य भाव मिळेल. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिणार असल्याचे अहलुवालिया यांनी सांगितले. पत्रपरिषदेला डॉ.दीपक कडू, सामाजिक कार्यकर्ते चंद्रपाल चौकसे आणि नागपूर भाजपचे उपाध्यक्ष भूषण दडवे उपस्थित होते.नागपुरात प्रयोगशाळानागपूर आणि विदर्भातील क्षेत्रात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी आणि दुधाची तपासणी करण्यासाठी प्रायोगिक स्तरावर प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यासोबतच एनटीडीसीच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात ३६३ गावात दूध संकलन केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून पशुपालक आणि शेतकºयांना दुधाचा रास्त भाव मिळेल.ड्राय मिल्क पासून १० लिटर दूधबाजारात २७ रुपये प्रति किलो ड्राय मिल्क पावडर मिळते. या पावडरपासून १० लिटर दूध तयार केले जाते. दुधाची भेसळ करणारे याच पद्धतीचा अवलंब करतात असा दावा अहलुवालिया यांनी यावेळी केला. यासोबतच गाई-म्हशीची दूध देण्याची क्षमता अधिक वाढविण्यासाठी प्रतिबंधित आॅक्सीटॉक्सीन या इंजेक्शनचा वापर केला जातो. दुधात होणाºया भेसळीसंदर्भात देशभरातील मागील दोन महिन्यात २७ हजार ९३३ प्रकरणे उजेडात आली आहेत.नागपुरात मिल्क महोत्सवदेशाचे केंद्रस्थळ असलेल्या नागपुरात लवकरच मिल्क महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यात सामान्य नागरिकांना दुधात होणारी भेसळ ओळखणे, त्यासंदर्भातील दक्षता याबाबतची माहिती मिळेल. या महोत्सवस्थळी प्रयोगशाळा स्थापन करून भेसळयुक्त दुधाची चाचणीही केली जाणार असल्याचे अहलुवालिया यांनी सांगितले.