शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मायलेकाला घरात घुसून मारहाण, हल्लेखोर फरार

By admin | Updated: October 31, 2016 15:19 IST

ऐन दिवाळीच्या दिवशी पाच जणांनी मिळून मायलेकावर घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 31 -  ऐन दिवाळीच्या दिवशी पाच जणांनी मिळून मायलेकावर घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोतवालीतील गवळीपुरा परिसरातील रविवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. या हल्ल्यात वीणा भेंडे आणि त्यांचा मुलगा अमर भेंडे जखमी झाले आहेत. हल्ला करणा-या पाच जणांनी मिळून अमर भेंडे या 24 वर्षांच्या तरुणाला चाकूने भोसकले तर त्याच्या आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.  
 
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमर आपल्या आईसोबत चित्रा टॉकीजजवळच्या पहेलवान चाळीत राहतो. रविवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कामावरुन घरी परत येत असताना त्याचे आजम रुस्तम पहेलवान आणि वसिम अक्रम शेख या दोघांसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. 
 
याचा राग मनात ठेवून रुस्तम, वसिम, नजिम अक्रम शेख, शरीफ शेरू आणि अशफाक यांनी मिळवून अमरला त्याच्या घरात घुसून मारहाण केली.  या पाच जणांनी चाकू आणि लाकडी दांड्याने मारुन अमरला जखमी केले, यावेळी अमरचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी धावलेल्या त्याच्या आईलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
 
यानंतरही हे पाचही जण फरार झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे निर्माण झाले आहे. वीणा भेंडे यांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत एकालाही अटक करण्यात आलेली नाही.