शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानी गाठणार ‘माईलस्टोन’

By admin | Updated: September 15, 2015 05:49 IST

स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर शहर बदलते जग व विकासाचे साक्षीदार राहिले आहे. शिक्षण, आरोग्य सुविधेसोबतच

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपूर शहर बदलते जग व विकासाचे साक्षीदार राहिले आहे. शिक्षण, आरोग्य सुविधेसोबतच सांस्कृतिक वारसा जपण्याचे कामदेखील नागपूरने केले आहे. हे शहर जरी ‘झीरोमाईल’चे असले तरी येणाऱ्या काळात विकासाचा ‘माईलस्टोन’ गाठण्यात नागपूरला यश येईल, असा विश्वास राष्ट्रपती मुखर्जी यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेचा १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा सोमवारी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात थाटात पार पडला. त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरबाबत गौरवोद्गार काढले.देशातील अनेक शहरांची ‘मेट्रो’ शहराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नागपूर शहरदेखील यात आघाडीवर आहे. रेल्वे, हवाई वाहतूक, रस्ते इत्यादीबाबतीत नागपूर विकसित आहे. शहराशी संबंधित विविध योजना जर समन्वय ठेवून राबविल्या तर नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ हा लौकिक मिळविण्यास फारसा वेळ लागणार नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात नागपूर महानगरपालिकेच्या दीडशेहून अधिक वर्षांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. १८६४ सालातील छोटे शहर ते आताचे महानगर असा विकास साधत असताना येथील महानगरपालिकेने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी टाळली नाही.भविष्यातही जनकल्याणाच्या योजना राबवून या शहराला वेगळी ओळख मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करेल, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले.पाऊण तास चाललेल्या या कार्यक्रमात खा. कृपाल तुमाने, खा. अजय संचेती, पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर, आ. कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, अनिल सोले, समीर मेघे, नागो गाणार, सुधीर पारवे, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग होता. प्रास्ताविक महापौर प्रवीण दटके यांनी केले. (प्रतिनिधी)सर्वांना आपलेसे करण्याची नागपूरमध्ये शक्तीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यावेळी नागपूरची संस्कृती व येथील नागरिकांच्या सहिष्णुवृत्तीचे भरभरून कौतुक केले. आज नागपूर शहराला ‘कॉस्मोपॉलिटन’ स्वरूप आले आहे. देशाच्या विविध भागांतून रोजगारासाठी शहरात येणारे लोक येथील संस्कृतीशी समरस होतात व निवृत्तीनंतरदेखील ते येथेच स्थायिक होतात. सर्व नागरिक एकत्रित मिळून, मिसळून एकतेने राहतात. सर्वांना आपलेसे करणे हीच नागपूरची सर्वात मोठी शक्ती आहे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.