शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

‘मिहान’चा ‘मेकओव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2015 02:36 IST

गजराज व सीआरपीएफ जमिनींचे हस्तांतरण आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे मिहानमध्ये उत्साह संचारला आहे.

मोरेश्वर मानापुरे नागपूरगजराज व सीआरपीएफ जमिनींचे हस्तांतरण आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे मिहानमध्ये उत्साह संचारला आहे. एम्स आणि आयआयएम या राष्ट्रीय स्तराच्या संस्थांमुळे मिहानला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा झळाळी प्राप्त झाली असून प्रकल्पाचा मेकओव्हर होत आहे.‘एम्स व आयआयएम’ला जमीन देण्यावर १९ रोजी निर्णयमिहानमध्ये विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर प्रारंभी आयआयएमला १४२ एकर आणि एम्सला १५० एकर जमीन देण्यात येणार आहे. जमिनीसंदर्भातील निर्णय मुंबईत १९ मे रोजी एमएडीसी संचालक मंडळाची बैठकीत होणार आहे. प्रारंभी दोन्ही संस्थांनी प्रत्येकी २०० एकर जागेची मागणी केली होती. पण एमएडीसीकडे एसईझेडबाहेर दहेगांव गोल्फ क्लबजवळ २९३ एकर जमीन आहे. या जमिनींचे वाटप दोन्ही संस्थांना देण्यात येणार आहे. संस्थांना हव्या असलेल्या एकूण ४०० एकरपैकी १०७ एकरच्या डिनोटिफिकेशनसाठी सहा महिने लागणार आहे. पण त्यांना तातडीने जागा हवी आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार दोन्ही संस्थांना जागा देण्याच्या निर्णयावर एमएडीसी संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. दोन्ही संस्थांचे निर्माण कार्य दोन महिन्यात सुरू होणार आहे. पुढील काही महिन्यात नव्या कंपन्या मिहानमध्ये येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. जमीन हस्तांतरणामुळे उत्साहगेल्या आठवड्यात हवाई दलाच्या गजराज प्रकल्पाची २७८ हेक्टर आणि सीआरपीएफची २.३ हेक्टर जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला. त्यामुळेच जमिनीसाठी एमएडीसीकडे विचारण होऊ लागली आहे. गजराज प्रकल्पाच्या हस्तांतरणाची कागदपत्रे एमएडीसीला लवकरच मिळणार आहे. या जमिनीच्या बदल्यात एमएडीसी गजराजला ४०० हेक्टर जागा देणार आहे. या जमिनीची कागदपत्रे तयार आहे. याशिवाय प्रस्तावित दुसऱ्या धावपट्टीला अडथळा ठरणाऱ्या जयताळाजवळील सीआरपीएफच्या २.३ हेक्टर जमिनीच्या बदल्यात एमएडीसी २.३ हेक्टर जागा सीआरपीएफला मौजा शिवणगाव येथे देणार आहे. सध्याच्या धावपट्टीसह आणखी एक धावपट्टी उभारणे, कार्गो हब तसेच हवाई क्षेत्राशी संबंधित अन्य कामांचा या विमानतळात समावेश राहणार आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे संबंधित कामांना वेग येणार आहे. इंदमार एमआरओला ३.५ एकर जमीनविमानतळाच्या विकासासाठी खासगी भागीदारांना आमंत्रित करण्यात येणार असून जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. गजराज जमीनच्या हस्तांतरण करारमुळे विमानतळाचा मिहान आणि कार्गो हबच्या विकासासाठी निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय ८ मे रोजी विकास आयुक्तांच्या नियमित बैठकीत मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली येथे कार्यरत इंदमार एमआरओला ३.५ एकर जागा मंजूर केली आहे. ही जागा बोर्इंग एमआरओ प्रकल्पाच्या मागे आहे. याशिवाय मार्कसन या औषधी कंपनीला १० एकर जमीन देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे.