शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

देशाचा मध्यबिंदू झिरो माईल स्तंभ : नागपुरातून मोजले गेले होते चहुबाजूचे अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:36 IST

भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असलेले शहर म्हणून संत्रानगरीची ओळख आहे. जी आज आहे तीच ओळख दोन-अडीचशे वर्षापूर्वीही होती. म्हणूनच भारताचे क्षेत्रफळ आणि चहुबाजूचे अंतर मोजता यावे म्हणून नागपुरातच एक मध्यबिंदू ठरविण्यात आला होता. ब्रिटिशांनी नाव दिलेला तोच हा झिरो माईल स्टोन म्हणून शून्य मैलाचा दगड होय.

ठळक मुद्देब्रिटिशांनी १९०७ मध्ये उभारला होता स्तंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असलेले शहर म्हणून संत्रानगरीची ओळख आहे. जी आज आहे तीच ओळख दोन-अडीचशे वर्षापूर्वीही होती. म्हणूनच भारताचे क्षेत्रफळ आणि चहुबाजूचे अंतर मोजता यावे म्हणून नागपुरातच एक मध्यबिंदू ठरविण्यात आला होता. ब्रिटिशांनी नाव दिलेला तोच हा झिरो माईल स्टोन म्हणून शून्य मैलाचा दगड होय.या ठिकाणी एक स्तंभ आणि एका ठिकाणाहून चारही दिशांचे प्रतीक म्हणून चार धावत्या घोड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. वाळूच्या दगडांनी याची निर्मिती करण्यात आल्याचे आणि चार घोडे राजस्थानहून आणण्यात आल्याचे सांगण्यात येते. या झिरो माईलची कथासुद्धा मजेदार अशीच आहे. १७६७ मध्ये देशाचा नकाशा तयार करण्यासाठी ब्रिटिशांनी ट्रिग्नोमॅट्रिक सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली होती. या विभागाच्या मार्फत त्यांनी देशात दळणवळणासाठी रस्ते बांधण्याचे काम हाती घेतले होते. देशाचा नकाशा तयार करण्याची जबाबदारी विल्यम लॅम्टन या सैन्य अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली. विशेष म्हणजे त्यावेळी सध्याचे पाकिस्तान आणि बांग्लादेशही भारताचाच भाग होता व त्यानुसार नागपूर हे मध्यवर्ती केंद्रबिंदू होते. त्यानुसार नकाशाचे काम सुरू झाले. मात्र हे काम सुरू असताना वाटेत वर्ध्याजवळ लॅम्टनचा मृत्यू झाला. त्यामुळे नकाशा तयार करण्याचे काम रखडले. हे काम जवळजवळ थंडबस्त्यात गेले. तब्बल ८४ वर्षांनी म्हणजे १९०७ साली पुन्हा नकाशा तयार करण्याचे काम सुरू झाले. त्याअंतर्गत सीताबर्डी किल्ल्याच्या पायथ्याशी झिरो माईल स्टोन उभारण्यात आला होता. ट्रिग्नोमॅट्रिक सर्व्हेनुसार या झिरो माईल स्तंभाची उंची समुद्र सपाटीपासून १०२०.१७१ फूट इतकी आखण्यात आली होती. हा नकाशा तयार करण्यात आल्यानंतर जवळजवळ १९४७ ला भारताच्या फाळणीपर्यंत याच ठिकाणाहून देशातील शहराचे अंतर मोजले जायचे. पुढे पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर जबलपूरजवळ भारताचा मध्यबिंदू निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.वर्तमान काळात उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठलेही अंतर सहज मोजले जाऊ शकते. मात्र त्याकाळात हे कठीण काम झिरो माईलजवळून करण्यात आले. या स्तंभावर देशातील आठ शहरांची लांबी मैलाच्या स्वरूपात उल्लेखित आहे. नागपूर शहर मध्यवर्ती आहे किंवा नाही हा चर्चेचा मुद्दा असू शकतो, मात्र झिरो माईल स्तंभाचे ऐतिहासिक महत्त्व नाकारता येत नाही. १०० वर्षाचा इतिहास या या स्तंभाच्या माध्यमातून चिन्हांकित झाला आहे, म्हणून तो ऐतिहासिक वारसा जोपासण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे.नागपूर मेट्रो करणार सौंदर्यीकरणसीताबर्डी ते कामठी रोडवरील नागपूर मेट्रोचे एक स्टेशन झिरो माईलजवळ राहणार आहे. याअंतर्गत झिरो माईल व बाजूला असलेल्या आदिवासी गोवारी शहीद स्मारकाचे सौंदर्यीकरण मेट्रो प्रशासनाद्वारे करण्यात येणार आहे. परिसरात २० माळ्याच्या दोन इमारती आणि वॉक वे तयार करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Zero Mileझीरो माईलnagpurनागपूर