शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोरिजन समिती‘पॉवरलेस’!

By admin | Updated: June 26, 2016 02:45 IST

नागपूर शहरापासून २५ कि.मी. परिसरात प्रस्तावित मेट्रोरिजनच्या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रोरिजन समितीची स्थापना करण्यात आली होती.

प्रारूपावर समितीत चर्चाही नाही : समितीचा फायदा काय?नागपूर : नागपूर शहरापासून २५ कि.मी. परिसरात प्रस्तावित मेट्रोरिजनच्या विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रोरिजन समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीचे सदस्यही निवडणुकीच्या माध्यमातून निवडण्यात आले. मात्र, लोकशाही पद्धतीने निवडलेल्या या समितीला काहीच अधिकार नसल्याचे चित्र समोर आले आहे. नासुप्रने मेट्रोरिजनच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी दिली. विश्वस्त मंडळातील काही सदस्यांनी आक्षेप घेतले असता, त्यांच्यासमक्ष पुन्हा एकदा सादरीकरण करण्यात आले व सुधारणेसह मंजूर करण्यात आला. मात्र, २८ सदस्य असलेल्या मेट्रोरिजन समितीसमोर याचा प्रस्तावदेखील ठेवण्यात आला नाही. समितीची स्थापना कशासाठी ?नागपूर : यावरून ही समिती काय कामाची, समिती स्थापन कशासाठी करण्यात आली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेचे प्रश्न, तक्रारी ऐकून घेण्यासाठी मेट्रोरिजनच्या समितीमध्ये लोकनियुक्त पदाधिकारी असावेत, असा विचार मांडण्यात आला होता. यातूनच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून समितीचे सदस्य निवडण्यात आले. महापालिकेतील २० व जिल्हा परिषदेतील ८ सदस्यांचा या समितीत समावेश आहे. समितीच्या स्थापनेनंतर फक्त एकदा देखाव्यासाठी समितीची बैठक घेण्यात आली. मात्र, या समितीचे काम काय असेल, अधिकार काय असतील याबाबत समितीतील सदस्यांनाही माहिती देण्यात आलेली नाही. आता तर समितीशी चर्चा न करता मेट्रोरिजनचा आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची तयारी नासुप्रने केली आहे.या प्रारूपात अजूनही बऱ्याच त्रुटी आहेत. त्याला मंजुरी मिळाली तर मेट्रोरिजनच्या क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होईल. नागरिक रस्त्यावर उतरतील. मेट्रोरिजनच्या प्रारूपावर यापूर्वीच ६ हजार ६४९ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. त्यावर सुनावणी घेण्यात आली. मात्र, नागरिकांनी सुचविलेले बदल किंवा केलेल्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही, अशी माहिती आहे.(प्रतिनिधी)