शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

मेट्रो एसबीआय महाकार्ड व मोबाईल अ‍ॅप दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:59 IST

नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये ऑनलाईन तिकिटांच्या खरेदीसाठी उपयुक्त एसबीआय महाकार्ड आणि मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार यांच्या हस्ते शनिवारी सीताबर्डी येथील इंटरचेंज स्टेशनवर करण्यात आले.

ठळक मुद्देबृजेश दीक्षित व देवेंद्रकुमार यांच्या हस्ते उद्घाटन : प्रवासाची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये ऑनलाईन तिकिटांच्या खरेदीसाठी उपयुक्त एसबीआय महाकार्ड आणि मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार यांच्या हस्ते शनिवारी सीताबर्डी येथील इंटरचेंज स्टेशनवर करण्यात आले. महाकार्डमुळे लोकांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल घडून येईल, शिवाय त्यांना दररोजच्या व्यवहारात कार्डची मदत होईल.दीक्षित म्हणाले, मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान महाकार्डचा अनेक लाभांसह उपयोग होणार आहे. प्रवाशांना मेट्रो स्टेशनवर तिकीट खरेदीसाठी रांगांमध्ये उभे राहण्यापासून मुक्तता तसेच वेळेची आणि ऊर्जेची बचत होणार आहे. रोख रकमेशिवाय प्रवास करण्यासोबतच नागपूर मेट्रोद्वारे वेळोवेळी जाहीर केलेल्या सुविधांचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे. या कार्डाद्वारे प्रवाशांना १० टक्के सवलत मिळेल. हे कार्ड अहमदाबादमध्ये दाखल झाले आहे. पण महाकार्ड त्यापेक्षा उत्तम आहे. दीक्षित म्हणाले, कार्ड पहिल्यांदा ३० सप्टेंबर २०१७ ला पहिल्या ट्रायल रनच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढच्या टप्प्यात २८ फेब्रुवारी २०१९ रोजी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते दाखल केले होते. त्यावेळी पाच हजार कार्डचे वितरण केले होते.देवेंद्र कुमार म्हणाले, महाकार्ड मुद्रित प्रीपेड कार्ड आहे. त्याचा उपयोग नागपूर मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी आणि रिटेल बँकिंगसाठी होणार आहे. कार्यक्षमतेसाठी या कार्डात ईएमव्ही चीपसह अनेक सेवा संग्रहित करण्याची सोय आहे. नागपूर मेट्रोने प्रवास करताना स्टेट बँक महाकार्ड जवळ बाळगल्यास इतर कुठल्याही प्रकारची रोख रक्कम सोबत ठेवण्याची गरज नाही. हे कार्ड कार्यान्वित करण्यासाठी नागपूर मेट्रो स्टेशनवर लावण्यात आलेल्या कार्ड रीडर्र्सवर हे कार्ड केवळ टॅप करावे लागेल. कार्डचे टॉपअप अकाऊंट आणि इंटरनेट बँकिंगद्वारे करता येईल.महाकार्ड जारी करण्यासाठी १५० रुपये शुल्क, सर्वाधिक शुल्क २ हजार, कमीतकमी टॉपअप शुल्क १०० रुपये असे कार्डचे स्वरूप आहे.याप्रसंगी महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (प्रकल्प) महेशकुमार, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक (सिग्नल) जयप्रकाश डेहारिया, कार्यकारी संचालक (इलेक्ट्रिकल) गिरीधर पौनीकर, कार्यकारी संचालक (रिच-१) देवेंद्र रामटेककर, ऑरियन प्रोचे कार्यकारी उपाध्यक्ष संजय बाली, स्टेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक आशुतोष शर्मा उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोSBIएसबीआय