शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे उड्डाण पुलावरून धावणार

By admin | Updated: September 17, 2015 03:29 IST

उत्तर-दक्षिण मार्गावर अजनी चौक ते हॉटेल प्राईडपर्यंत मेट्रो रेल्वे उड्डाण पुलावरून धावणार आहे.

अजनी ते हॉटेल प्राईड : एनएचएआय उड्डाण पूल बांधणारनागपूर : उत्तर-दक्षिण मार्गावर अजनी चौक ते हॉटेल प्राईडपर्यंत मेट्रो रेल्वे उड्डाण पुलावरून धावणार आहे. उड्डाण पूल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) बांधणार असून त्यावर कंपनी मेट्रो रेल्वेसाठी बांधकाम करणार असल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. अजनी ते प्राईड हॉटेल हा ३.५ कि़मी.चा मार्ग आहे. यावर मेट्रो रेल्वेचे पाच स्टेशन राहणार आहे. नवीन बांधकामासाठी छत्रपती चौकातील उड्डाण पूल तोडण्यात येणार आहे. त्याऐवजी चार पदरी रस्ता, उड्डाण पूल आणि त्यावर मेट्रो रेल्वे धावणार आहे. मेट्रो रेल्वेसाठी ‘एनएमआरसीएल’चे स्वतंत्र बांधकाम राहील. त्यासाठी डिटेल डिझाईन कन्सलटंटची (डीडीएस) नियुक्ती करण्यात येणार आहे. शिवाय मुंजे चौक ते खापरीपर्यंत ७.५ कि़मी.चे डिझाईन आणि बांधकामासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. दोन टप्प्यातील निविदांंपैकी एका टप्पा उघडण्यात आला आहे. त्याचे मूल्यांकन सुरू आहे. दुसरा टप्प्यातील निविदा आॅक्टोबरमध्ये काढण्यात येणार आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या सात निविदा प्रक्रियेपैकी ही एक प्रक्रिया आहे. या मार्गावर खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट, उज्ज्वलनगर, जयप्रकाशनगर, छत्रपती चौक, अजनी, रहाटे कॉलनी, काँग्रेसनगर असे नऊ स्टेशन राहतील, असे दीक्षित म्हणाले. (प्रतिनिधी)जनरल कन्सलटंट नोव्हेंबरमध्येप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी जनरल कन्सलटंट हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. यासाठी कंपनीने आॅनलाईन निविदा बोलविल्या होता. त्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांनी भाग घेतला. ही निविदा तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. अंतिम टप्प्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता दीक्षित यांनी वर्तविली. जर्मनी व फ्रान्सची चमू आॅक्टोबरमध्ये येणारमेट्रो रेल्वे प्रकल्प ८६८० कोटी रुपयांचा असून त्यात ४,५२१ कोटी कर्जस्वरूपात राहतील. ८० टक्के अर्थात ३७०७.८० कोटींच्या (५०० दशलक्ष यूरो) कर्जाला जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेने मंजुरी दिली आहे. तसेच फिडर सर्व्हिस आणि सोलर एनर्जी उभारणीसाठी ६० दशलक्ष यूरो कर्ज अतिरिक्त देणार आहे. याशिवाय उर्वरित २० टक्के अर्थात १३० दशलक्ष यूरो फ्रान्सची फे्रंच डेव्हलपमेंट एजन्सी देणार आहे. या दोन्ही एजन्सीचे अधिकारी आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात नागपुरात येणार असून मेट्रो रेल्वेच्या विकास कामांचा आढावा घेतील, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले. मनीषनगरात रेल्वेवर उड्डाण पूलसुमारे ३.५ कि़मी.च्या उड्डाण पुलावरून मनीषनगरकडे जाणाऱ्या मार्गावर महामार्ग प्राधिकरण जवळपास अर्धा कि़मी. रेल्वेवर उड्डाण पूल बांधणार आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर उड्डाण पूल असावा, अशी येथील नागरिकांची २० वर्षांपासूनची मागणी या प्रकल्पामुळे पूर्ण होणार आहे. उड्डाण पुलामुळे या भागातील रहिवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.