शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
13
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
14
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
15
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
17
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
18
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
19
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
20
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

मेट्रो रेल्वेच्या कर्जावर १० ला शिक्कामोर्तब

By admin | Updated: April 6, 2016 03:06 IST

मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुगीचे दिवस आले असून बांधकामाला वेग आला आहे. पिलर उभारणीचे काम सुरू झाले आहे.

फडणवीस, गडकरी यांच्या उपस्थितीत होणार ‘फॉलोअप’ करारनागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुगीचे दिवस आले असून बांधकामाला वेग आला आहे. पिलर उभारणीचे काम सुरू झाले आहे. विदेशी कर्जाचा मार्ग मोकळा झाला आहे. जर्मनीच्या केएफडब्ल्यू वित्तीय संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या कर्जाच्या एकूण रकमेवर नागपुरात हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये १० एप्रिलला सकाळी ९ वाजता शिक्कामोर्तब होणार आहे. ‘फॉलोअप’ कर्ज करारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील. ३७५० कोटी रुपयांच्या कर्ज करारावर केएफडब्ल्यू आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी स्वाक्षरी करतील. जर्मनीच्या केएफडब्ल्यू वित्तीय संस्थेतर्फे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला जवळपास ३७५० कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. यासंदर्भात १ एप्रिलला दिल्ली येथे एका छोटेखानी समारंभात डिपार्टमेंट आॅफ एकॉनॉमिकल अफेयर्स आणि केएफडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली होती. आता अंतिम करार १० एप्रिलला नागपुरात होणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प ८६८० कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येत आहे. यातील ३७५० कोटी रुपये कर्ज स्वरुपात मिळणार आहे. यात नागपूर मेट्रोचे डबे, मेट्रो मार्ग, वीज पुरवठा, ट्रॅक्शन, बांधकाम आदी कामे पूर्ण करण्यात येतील. कर्ज स्वरुपात मिळणाऱ्या रकमेची परतफेड २० वर्षांत करण्यात येणार आहे. यात पहिले पाच वर्ष केवळ व्याज फेडायचे आहे. व्याजदर ०.६ टक्के राहणार आहे. (प्रतिनिधी)