शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात  मेट्रोच्या प्रवासी संख्येत ११ टक्के वाढ : १८,०७७ नागरिकांनी केला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 00:32 IST

महामेट्रोच्या दोन्ही मार्गावरील सेवा सुरू झाली असून, प्रत्येक आठवड्यात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काल रविवारी प्रवाशांच्या संख्येत तब्बल ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्देएका दिवसात ३.२५ लाखाचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या दोन्ही मार्गावरील सेवा सुरू झाली असून, प्रत्येक आठवड्यात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत काल रविवारी प्रवाशांच्या संख्येत तब्बल ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. रविवारी १८,०७७ नागरिकांनी ऑरेंज आणि अ‍ॅक्वा मार्गावर मेट्रोने प्रवास केला. यातून ३.२५ लाखाचे उत्पन्न महामेट्रोला प्राप्त झाले आहे. ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी तसेच अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवर दर ३० मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर किवा वासुदेव नगरपर्यंत प्रवास करण्यासाठी प्रवाशांना केवळ २० रुपये मोजावे लागत असून, सीताबर्डी इंटरचेंज ते सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स किवा झाशी राणी चौक मेट्रो स्टेशनपर्यंतच्या प्रवासासाठी केवळ १० रुपये मोजावे लागतात. मुख्य म्हणजे मेट्रोने आता शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी प्रवास करू लागले आहेत.लोकमान्यनगर ते खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट आणि जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी दर ३० रुपये आहे. शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने नागरिकांचा मोठा फायदा झाला आहे. अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मार्गाहून प्रवास करीत आहेत. ऑरेंज लाईन मार्गिकेवर जयप्रकाशनगर, एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, न्यू एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशन तसेच अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेवरील झाशी राणी, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, सुभाषनगर, वासुदेवनगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनवर सेवा उपलब्ध आहे.

टॅग्स :Metroमेट्रोpassengerप्रवासी