शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘मेट्रो’ने बोध घेतला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:16 IST

आंतरराष्ट्रीय स्तराची मेट्रो रेल्वे नागपुरात सुरू करण्याचा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात येत आहे, परंतु विदेशातील विशेतज्ज्ञांचा समावेश असलेली...

ठळक मुद्देक्रेन कोसळल्यानंतर शोधताहेत उपाय : महामेट्रोच्या कार्यप्रणालीवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय स्तराची मेट्रो रेल्वे नागपुरात सुरू करण्याचा दावा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात येत आहे, परंतु विदेशातील विशेतज्ज्ञांचा समावेश असलेली जनरल कन्सलटंटची चमू, अनुभवी अभियंत्यांची चमू आणि मोठ्या कंत्राटदार कंपन्यांना मोठ्या गंभीर घटना थांबविण्यात अपयश आले आहे. पूर्वी झालेल्या घटनांपासून बोध घेतला असता तर गुरुवारी सकाळी संत्रा मार्केट परिसरात मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान क्रेनचे टॉवर कोसळले नसते.क्रेन कोसळण्याचा घटनेचे मूळ शोधून पुढे अशा घटना होणार नाहीत, यासाठी उपाय शोधण्याच्या कामात जनरल कन्सलटंट आणि मेट्रोची चमू जुंपली असल्याचा महामेट्रोतर्फे दावा करण्यात येत आहे.यापूर्वी आॅगस्ट २०१६ मध्ये वर्धा रोडवरील अजनी चौकात मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान तैनात करण्यात आलेला ट्रॅफिक वार्डन मारुती ठाकरे यांना एका चारचाकी वाहनाने उडविले होते. या गंभीर घटनेत मेट्रोशी जुळलेल्या कामगाराचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही महामेट्रोने कोणताही बोध घेतला नाही. त्यानंतरसुद्धा मेट्रोच्या खड्ड््यांमुळे पादचारी आणि वाहनचालकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडेच मेट्रोच्या खड्ड््यामध्ये एक दुचाकीस्वार पडल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर यावर्षी आॅगस्टमध्ये हिंगणा रोडवर मेट्रो साईटच्या बाजूला रस्त्यावर एका अपघातात दुचाकीस्वार वनिता मसराम यांचा मुलगा रितेशचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मेट्रोची चूक दिसून येत नाही, पण मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे अरुंद झालेल्या मार्गावर वाहतूक खोळंबल्याची स्थिती नेहमीच दिसून येते.वर्धा रोडवर शुक्रवारी मेट्रोचा काँक्रिट मिक्सर रस्त्यात रूतून बसला. कारण तेच आहे की, मेट्रोच्या बांधकामामुळे रस्ता अरुंद झाल्यामुळे या काँक्रिट मिक्सरला अपघात झाला. नागरिकांच्या मागणीनंतर काम झालेल्या जागेच्या सभोवतातील बॅरिकेट्स हटविण्यास नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला सांगण्यात आले होते. या कंपनीने महिन्यांपासून लावलेले बॅरिकेट्स हटविले, पण बॅरिकेट्स हटविल्यानंतर जागा समतोल आहे किंवा नाही, हे पाहिले नाही. बॅरिकेट्सच्या आजूबाजूला मोठे खड्डे दिसून येत आहेत. खड्डे बुजविण्याचे साधे सौजन्यही कंपनीने दाखविले नाही. वर्धा रोडवर खड्डा बुजविला असता तर काँक्रिट मिक्सर खड्ड््यात गेला नसता.लवकरच येणार तपासणी अहवालमहामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे यांनी सांगितले की, संत्रा मार्केट परिसरात क्रेनचे टॉवर कोसळल्याच्या घटनेचा तपासणी अहवाल दोन ते तीन दिवसात येणार आहे. जनरल कन्सलटंटच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केली आहे. रिच-४ चे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश कुमार या घटनेची चौकशी करीत आहेत. अहवालानंतर आवश्यक उपाय आणि भविष्यात अशी घटना होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.