शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रिजनच्या उर्वरित विकास प्रारुपला मिळाली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:12 IST

नागपूर महानगर प्रदेश (मेट्रोरिजन) विकास प्रारुपच्या उर्वरित भागालाही राज्य सरकारने अखेर अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. यासोबतच सर्व प्रारुपला अंतिम मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात २१ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागातर्फे अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. अधिसूचनेत २८ स्थळांच्या आरक्षणाची स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. यासोबतच मेट्रोरिजनमध्ये येणाऱ्या क्षेत्राचा विकासाचा मार्ग निश्चित झाला आहे.

ठळक मुद्दे२८८ ठिकाणच्या आरक्षण बदलाची अधिसूचना जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगर प्रदेश (मेट्रोरिजन) विकास प्रारुपच्या उर्वरित भागालाही राज्य सरकारने अखेर अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. यासोबतच सर्व प्रारुपला अंतिम मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात २१ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागातर्फे अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. अधिसूचनेत २८ स्थळांच्या आरक्षणाची स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. यासोबतच मेट्रोरिजनमध्ये येणाऱ्या क्षेत्राचा विकासाचा मार्ग निश्चित झाला आहे.मेट्रो रिजन अंतर्गत नागपूर तहसीलच्या ७२१ गावांना सामील करण्यात आले आहे. नागपूर महानगरच्या प्रदेश प्रारुप विकास योजनेला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अंतर्गत अधिसूचना राज्य सरकारच्या राजपत्रात ९ जानेवारी २०१८ रोजी प्रकाशित करण्यात आली. यानंतर २१ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रथम, व २९ जून २०१८ रोजी द्वितीय शुद्धीपत्रक प्रकाशित करण्यात आले होते. नागरिकांकडून आक्षेप, सूचनाही मागवण्यात आल्या होत्या. या आधारावर १९ जुलै २०१८ व ७ डिसेंबर २०१८ रोजी रिपोर्ट सरकारला सादर करण्यात आला.ज्या ठिकाणच्या आरक्षणाबाबत आक्षेप होते त्याला सोडून प्रारुपचे प्रकाशन नगर विकास विभागातर्फे अगोदरच करण्यात आले आहे. आक्षेप व सूचनांची समीक्षा व आवश्यक चौकशीसाठी प्रारुपला संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सल्ल्यासाठी पाठवण्यात आले होेते. आपत्तींची चौकशी करून प्रारुपमध्ये बदलाची शिफारस करण्यात आली होती. ज्या २८८ क्षेत्रांच्या आरक्षणात बदल करण्यात आले आहेत, त्यामध्ये मेट्रोरिजनच्या प्रत्यक्ष क्षेत्राचा समावेश आहे. यात हिंगणा, गोधनी, बोरखेडी, नागपूर तहसील, कळमेश्वर, पारशिवनी आदी परिसराचा समावेश आहे.नागपूर महानगर प्रदेश (मेट्रोरिजन)चे सुटलेल्या क्षेत्रातील विकास योजनेची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून एका महिन्यात त्यावर अमल केला जाईल. संबंधित अधिसूचना राज्य सरकारच्या अधिकृत बेवसाईटवरही उपलब्ध आहे. ५५ पृष्ठांच्या अधिसूचनेत २८८ ठिकाणच्या आरक्षणात आपत्तीनुसार बदल करण्यात आले.समग्र विकासाचा मार्ग मोकळानासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार यांनी सांगितले की, मेट्रोरिजनच्या विकास प्रारुपबाबत आक्षेप आले होते. आक्षेपांच्या सुनावणीनंतर राज्य सरकारला रिपोर्ट पाठवण्यात आला होता. रिपोर्टच्या चौकशी व तपासणीनंतर मेट्रोरिजनचे उर्वरित शिल्लक राहिलेल्या क्षेत्राचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे यामुळे मेट्रोरिजनच्या समग्र विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिसूचनेत २८८ ठिकाणांच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर