लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासचे महानगर पालिकेत विलिनीकरण करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया नासुप्र सभापती आणि मनपा आयुक्त यांनी वेगाने करावी. शासनाने दिलेल्या मर्यादेपर्यंत हे विलिनीकरण झाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले.नासुप्रच्या सभागृहात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त ठाकरे, हेमंत पवार व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या संदर्भात बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, नासुप्रची देणी आणि नासुप्रला मिळणारा निधी याचा विचार व्हावा. कर्मचाऱ्यांचे आदानप्रदान या बाबी विचारात घेऊन प्रस्ताव तयार करा व तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.ताजबाग विकास आराखडाताजबाग विकास आराखड्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. शासनाने यंदाच्या कामासाठी अंदाजपत्रकात ५० कोटींची तरतूद केली आहे. सिमेंट रोड, मोठा ताजबागचे प्रवेशद्वार या विषयावर चर्चा करण्यात आली. सिवरेज ट्रीटमेंट प्लँटसाठी २.५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विजेचा खर्च पाहता या तरतुदीतही बचत होण्याची शक्यता आहे. सिवरेज ट्रीटमेंट प्लँटला सौर ऊर्जेवर घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. ताजबाग परिसरातील पाण्याची टाकी अमृत योजनेतून मनपा करीत आहे. तसेच वांजरा, कळमना, चिचभवन व नारी या चार टाक्यांचे काम नासुप्रने त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.सिम्बायोसिससिम्बायोसिसमुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांची ८ घरे पाडली गेली. एकूण ५६ घरे येथे आहेत. ही जागा मनपाची आहे. विस्थापितांची अन्य घरे सध्या पाडू नका. त्यांना अन्य ठिकाणी जागा व घरबांधणीसाठी अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा. त्यानंतर त्यांची घरे हटविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. उर्वरित नागरिकांनी आता त्या जागेवर बांधकामे करू नयेत, असेही सांगण्यात आले. प्लॉटधारक आऊटर रिंग रोड भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत मौजा नारा खसरा क्रमांक १४ व १६ वेलकम सोसायटीने पाडलेले आऊटचे विषयावर स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा बैठक घेतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले. क्राऊन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मौजा चिचभुवन येथील विकासकादरम्यान मुख्य रस्ता भूखंडधारकाचे भूखंडामधून टाकल्याबाबतच्या तक्रारीवर नासुप्रतर्फे रस्ता अन्य ठिकाणाहून वळवून बांधून देण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.पाणी दर कमी करागोन्ही सिम येथील पाणी कराचे दर कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली असता दर कमी करणे शक्य नाही. पण जास्त रकमेची बिले मात्र दुरुस्त करता येतील. नागरिकांच्या या बाबी तपासून पाहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिल्या.मौजा इसासनीमौजा इसासनी येथील जमीन ९३-९४ मध्ये खासगी जागेवर नागरिकांनी भूखंड घेतले. नंतर ही जागा मिहान प्रकल्पात गेली. मिहानने ही जागा गजराज प्रकल्पाला दिली. ज्या भूखंडधारकांचे भूखंड या प्रकल्पात गेले त्यांना मोबदला मिळाला नाही. आता या नागरिकांना मोबदला नको, जागेच्या बदल्यात जागाच पाहिजे आहे.नागपूर-जबलपूर नॅशनल हाय-वेनागपूर जबलपूर नॅशनल हाय वे वर गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत तीन अपघात झाले. या अपघातात तिघे जण मृत्युमुखी पडले, याकडे खैरीच्या सरपंचांनी लक्ष वेधले असता. अत्यंत गंभीर प्रकार असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यावर उपाययोजना करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या रस्त्यावर नागपूर कामठी कन्हान व नागपूर भंडारा या दोन्ही महामार्गाचे सिक्युरिटी ऑडिट करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे देण्यात आले.नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रांमध्ये विषारी सापांच्या प्रतिबंधक लसीचा नियमित पुरवठा करावा या मागणीसाठी आढावा घेताना आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. ३० केंद्र शहरी भागात आणि ६४ केंद्र ग्रामीण भागात आहेत. आतापर्यंत कुणाचाही साप चावून मृत्यू झाल्याची घटना नाही.यावेळी पंतप्रधान आवास योजना व महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या विषयावर उपाययोजना संबंधी चर्चा करण्यात आली.
दिलेल्या मुदतीत नासुप्रचे मनपात विलिनीकरण करा : पालकमंत्र्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 20:29 IST
नागपूर सुधार प्रन्यासचे महानगर पालिकेत विलिनीकरण करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया नासुप्र सभापती आणि मनपा आयुक्त यांनी वेगाने करावी. शासनाने दिलेल्या मर्यादेपर्यंत हे विलिनीकरण झाले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले.
दिलेल्या मुदतीत नासुप्रचे मनपात विलिनीकरण करा : पालकमंत्र्यांचे निर्देश
ठळक मुद्देताजबाग विकास आराखडा आढावा