शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

गांधीजींच्या योगदानावर संशय घेणाऱ्यांची मानसिकता हिंसक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 20:06 IST

आज काही लोक गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नाही असे बोलतात. अशांची मानसिकताच हिंसक असल्याची टीका ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अ‍ॅड. मा.म.गडकरी यांनी केली.

ठळक मुद्देमा.म.गडकरी : कस्तुरबा जयंतीनिमित्त बा-बापू मुक्तांगणाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंसेच्या मार्गाने राष्ट्र बळकावली जाऊ शकतात, मात्र त्यातून प्रश्न सुटत नाही. कोणत्याही लढ्यासाठी अहिंसेचा मार्ग हाच पर्याय आहे, याची जाणीव महात्मा गांधी यांनी जगाला करून दिली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सामान्य जनतेच्या मनात स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण व्हावी लागते. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने ही ज्योत जागविण्याचे काम केले त्यामुळे देशातील जनता त्यांच्यासोबत स्वातंत्र्य लढ्यात सामील झाली. आज काही लोक गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळाले नाही असे बोलतात. अशांची मानसिकताच हिंसक असल्याची टीका ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अ‍ॅड. मा.म.गडकरी यांनी केली.कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे बुधवारी बा-बापू मुक्तांगण व चरखा मंदिराचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे, सुरेखा देवघरे, महाराष्ट्र गांधी स्मारक समितीचे सुनील पाटील, चित्रा तुर, रवी गुडधे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. गडकरी म्हणाले, गांधीजींनी देशाला हिंसेच्या मार्गातून अहिंसेकडे नेले. अ‍ॅड. गडकरी यांनी कस्तुरबा पारशिवनीच्या शाळेच्या उद्घाटनाला आल्याची आठवण यावेळी नमूद केली. कस्तुरबांनी मनापासून गांधीजींच्या कार्यात सहभाग घेतल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी लीलाताई चितळे म्हणाल्या, कस्तुरबा हे निष्ठेचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी स्त्रीत्व कमी पडू दिले नाही आणि पुरुषांशी स्पर्धाही केली नाही. कस्तुरबा त्याग अंगिकारणाऱ्या जीवनाची प्रेरणा होत्या. आज दिशा दाखविण्यासाठी नव्या पिढीसमोर कोणते आदर्श ठेवावेत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहनही तरुणांना केले.यावेळी सुरेखा देवघरे यांनी मोहनदास गांधी ते ‘महात्मा’पर्यंतच्या प्रवासात कस्तुरबा यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांचे शिक्षण अल्प असले तरी बुद्धी चाणाक्ष होती व त्यांना वर्तमानाचे भान होते. कस्तुरबाचे पतिव्रत अंधश्रद्ध नव्हते तर त्यांनी अनुभवातून डोळसपणे गांधीजींना स्वीकारले व त्यांच्या देशसेवेत सहभाग घेतला. कस्तुरबा गेल्यानंतर माझ्या जीवनात पोकळी निर्माण झाल्याचे गांधीजींनी नमूद केले होते. गांधीजींच्या जीवनात कस्तुरबा या खरोखर कस्तुरीसारख्या होत्या. मात्र त्यांच्या कार्याची हवी तशी दखल घेतली गेली नाही व गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात त्यांचे कार्य झाकोळल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्ष धार्मिक ग्रंथाचे पारायण करण्यापेक्षा कस्तुरबाच्या जीवनकार्याचे वाचन होईल अशा कार्यक्रमाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनिल वाघ यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक