शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नाश्ता करताना मनोरुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:26 IST

सकाळचा नाश्ता करीत असतानाच अचानक मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास प्रादेशिक मनोरुग्णालयात घडली. हा रुग्ण गेल्या सात वर्षांपासून रुग्णालयात उपचार घेत होता.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : २०११ पासून घेत होता उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सकाळचा नाश्ता करीत असतानाच अचानक मनोरुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास प्रादेशिक मनोरुग्णालयात घडली. हा रुग्ण गेल्या सात वर्षांपासून रुग्णालयात उपचार घेत होता.संजय नागलकर (५५) रा. बुलडाणा असे रुग्णाचे नाव आहे. मनोरुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ८ मधून त्याच्यावर उपचार सुरू होते. नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी सकाळी ८.३० वाजता सर्व रुग्णांसोबत संजयलाही नाश्ता दिला. परंतु नाश्ता करीत असतानाच तो खाली कोसळला. अटेन्डन्सपासून ते डॉक्टर धावले. तपासणी केल्यावर मृत्यू झाल्याचे कळले. संजयच्या गळ्यात नाश्ता फसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. संजयला कुटुंबीयांनी मनोरुग्णालयात आणले तेव्हा तो फ्रॅक्चर होता. दरम्यान, रक्तदाब व लकव्यानेही त्याला ग्रासले होते. त्याला दोन्ही पायांनी चालताही येत नव्हते. दीर्घकाळापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. प्रशासनाने संजयच्या मृत्यूची सूचना मानकापूर पोलिसाना दिली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह मेयोत पाठविला आहे.नातेवाईकांनी दिला चुकीचा पत्तासंजयला मनोरुग्णालात भरती करताना कुटुंबीयांनी चुकीचा पत्ता दिला होता. २०१३ मध्ये संजय बरा झाला. मनोरुग्णालय प्रशासनाने त्याला त्याच्या पत्त्यावर घेऊन गेले. परंतु चुकीचा पत्त्यामुळे त्याला पुन्हा रुग्णालयात आणावे लागले. नियमानुसार दोन दिवसात नातेवाईक न आल्यास प्रशासनच संजयवर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयDeathमृत्यू