शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

आठवणीतील निवडणूक; ४० हजार खर्च व्हायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:01 IST

लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची.

ठळक मुद्देनिवडणूक प्रचार स्वच्छता मोहिमेचे माध्यमप्रभात फेऱ्या निघायच्या

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची. विशेष म्हणजे पन्नास साठच्या दशकात निवडणूक प्रचार हा स्वच्छता मोहिमेचे माध्यम असायचा.९० वर्षाचा टप्पा ओलांडलेले माजी आमदार यादवराव देवगडे यांना तो काळ आजही स्पष्टपणे आठवतो. १९५२ आणि १९५७ च्या पहिल्या दोन लोकसभा निवडणूकांवर स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतिबिंब दिसून आले होते. दोन्ही निवडणूकांत कॉंग्रेसचाच विजय झाला होता. विरोधी पक्ष प्रभावी नव्हता. जनसंघ व हिंदू महासभेसोबतच समाजवादी जनाधार शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्याकाळी आजसारखा दारू आणि पैशांचा खेळ होत नव्हता. सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ता व गांधीवादी प्रभातफेरी काढून जनतेत जायचे. ते जेथून जायचे, तेथे स्वच्छता मोहीम राबविण्यात यायची. उमेदवारदेखील घरोघरी जाऊन जनसंपर्कावर भर देत असत. जर रस्त्यात प्रतिस्पर्धी उमेदवार भेटला तर त्याच्याशी आत्मियतेने संवाद व्हायचा. पक्षाच्या विचारधारेला जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भिंतीवर लिहिले जायचे. लाऊडस्पीकरचादेखील मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा. मात्र थेट संपर्कावर जास्त भर असायचा. निवडणुकींचे चिन्ह असलेले बिल्ले वाटले जायचे व लहान मुलांमध्ये त्याचे प्रचंड आकर्षण होते, असे यादवराव देवगडे यांनी सांगितले.तिकीट तेव्हादेखील कापले जायचेपन्नासच्या दशकात यादवराव देवगडे सेवादलाचे कार्यकर्ता म्हणून शहराच्या राजकारणात सक्रिय होते. १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणूकीदरम्यान तत्कालिन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या नावाची शिफारस हायकमांडकडे केली होती. मात्र तिकीट अनसूयाबाई काळे यांना मिळाले होते. मला त्याचे अजिबात वाईट वाटले नव्हते. कॉंग्रेस कार्यकर्ता म्हणून मी मनाने पक्षाचे कार्य केले व काळे सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या, असे त्यांनी सांगितले. पक्षाने १९६७ साली पूर्व नागपुरातून तिकीट देऊन त्यांना विधानसभेत पोहोचविले. त्या वेळेत कॉंग्रेसच्या तिकीटावर विजय मिळाला होता, मात्र तेव्हा विदर्भवाद्यांचे प्रस्थ वाढले होते. १९६२ साली कॉंग्रेसला हरवत बापूजी अणे खासदार बनले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक