शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

१०,००० वर सखींनी घेतली सदस्यता

By admin | Updated: January 11, 2015 00:50 IST

महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून मनामनांत घर करून बसलेल्या लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदस्यत्व घेण्यासाठी सायंकाळपर्यंत सखींची गर्दी होती.

लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद : आज २१ ठिकाणी नोंदणी नागपूर : महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून मनामनांत घर करून बसलेल्या लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीला पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदस्यत्व घेण्यासाठी सायंकाळपर्यंत सखींची गर्दी होती. या केंद्रांवर १८ वर्षांपासून ते ८० वर्षांच्या वयोगटातील हजारो युवती, महिला सखी मंचच्या सदस्य झाल्या. सायंकाळपर्यंत १० हजाराच्यावर सदस्य नोंदणी झाली. सखी मंच सदस्यता मोहिमेला घेऊन आज दिवसभर चर्चा होती. सदस्य झालेल्या सखी आपल्या शेजाऱ्यांसोबतच नातेवाईकांनाही यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करीत होते.शहराच्या विविध भागातील सखींना सहजपणे सदस्य होता यावे, यासाठी २० केंद्रांवर सदस्य नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. सदस्यत्व घेतल्यानंतर मिळणारे सखी मंचच्या आकर्षक ओळखपत्रासोबतच कढईचा सेट, बांगड्या, डायट बूक, अपघाती मृत्यूचा विमा, सेल्फ ग्रुमिंग ट्रेनिंग कूपन, फ्री हेअरकट कूपन, फूड कूपन, फ्री हेल्थ चेकअप कूपन हातात पडताच सखी हरखून जात होत्या. लोकमत सखी मंचची ही सदस्य मोहीम उद्या रविवार ११ जानेवारी रोजीही सुरू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणावरील २१ केंद्रांवर सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत ही नोंदणी होईल. सदस्य होताच सखींना ओळखपत्रासोबतच घोषित केलेल्या सर्व भेटवस्तू मिळतील. सोबतच ११ दिवस लकी ड्रॉ धमाका, राज्यस्तरीय लकडी ड्रॉ मध्ये सहभागी होण्याची संधीही मिळेल. विशेष म्हणजे, सदस्य नोंदणीच्या केंद्रावर काही मिनिटांतच सदस्यता प्राप्त करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदस्यत्व नोंदणीच्या अधिक माहितीसाठी ‘लोकमत’च्या ‘हॅलो नागपूर’ या अंकात पृष्ठ क्रमांक ३वर प्रसिद्ध जाहिरात पहावी. सदस्यत्व घेण्याच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच कार्यालय, लोकमत भवन रामदासपेठ येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक २४२९३५५, ९८५०३०४०३७, ९८२२४०६५६२, ९९२२९१५०३५ किंवा ९३२६२८९७७७ वर संपर्क साधावा. सदस्यता नोंदणीच्या या मोहिमेत सुवर्ण स्पर्श, युनिक स्लिम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनीक, कलाकृती साडी अ‍ॅण्ड ड्रेस मटेरियल, बायझोन अ‍ॅण्ड कॅबेलो, लोटस ग्रॅण्ड मल्टीक्यूजिन अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, दंदे हॉस्पिटल, अमेरिकन टुरिस्टर यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.(प्रतिनिधी)आपल्या घरी बोलवा सदस्य नोंदणीच्या चमूलालोकमत सखी मंचची सदस्यता घेण्यासाठी इच्छुक महिलांसाठी एक अभिनव सोय करण्यात आली आहे. जर २५ पेक्षा जास्त महिला किंवा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, बचत गट आदींचा समूहातील महिला सदस्य होण्यास इच्छुक असतील तर बोलविण्यात आलेल्या निश्चित स्थळी सदस्यता नोंदणीच्या चमू पोहचण्याची व्यवस्था करण्यात येईल. या सोयीसाठी मोबाईल क्रमांक ९४२३६२८५०० यावर संपर्क साधावा.पहिल्या दिवशीचा लकी ड्रॉ घोषित सदस्य नोंदणीच्या निमित्ताने सखींसाठी ११ दिवसांपर्यंत लकी ‘ड्रॉ धमाका’चे आयोजन करण्यात आले आहे. यात सखींना आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळाली आहे. आज शनिवार पहिल्या दिवशी सदस्य नोंदणीच्यावेळी सर्व सखींनी कूपन जमा केले. सायंकाळी या कूपनचा लकी ड्रॉ काढण्यात आला. आजच्या या ‘ड्रॉ’चे प्रायोजक ‘कलाकृती साडीज्’ हे होते. भाग्यवंत विजेत्याचा ओळखपत्र क्रमांक (लोकमत सखी मंचच्या ओळखपत्रावर लिहिलेला क्रमांक) २८९, ५६३, ७६९, १०६१, ११२२, १४५१, १६०४, १९०४, २००९, १०५६१, ९४८२, ८२३०, १०८०५, ३२३५, २७५५, ३६९०, २२०९, ३४६५, ३९३५, ४६१२ हा आहे. या क्रमांकांच्या भाग्यवंत सखींनी सखी मंचचे ओळखपत्र घेऊन कलाकृती साडी शोरुम, बडकस चौक, महाल येथे सोमवारी आपला पुरस्कार प्राप्त करावा. उद्या रविवारीही कलाकृती साडीज्कडून लकी ड्रॉचे आयोजन प्रत्येक केंद्रासाठी करण्यात आले आहे.