शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काश्मीरच्या हिंसाचारला मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार : मेजर गौरव आर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 21:53 IST

काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत. या हिंसाचारामुळे त्यांचा तिजोऱ्या भरत आहे. त्यांना तिथे कधीच शांतता नको आहे. काश्मीरबद्दलची देशाची ठोस पॉलिसी नसल्यामुळे हिंसाचाराचा ड्रामा वर्षानुवर्षे सुरू असल्याचे मत मेजर गौरव आर्य यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदगडफेक करणाऱ्यांना मिळतात पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत. या हिंसाचारामुळे त्यांचा तिजोऱ्या भरत आहे. त्यांना तिथे कधीच शांतता नको आहे. काश्मीरबद्दलची देशाची ठोस पॉलिसी नसल्यामुळे हिंसाचाराचा ड्रामा वर्षानुवर्षे सुरू असल्याचे मत मेजर गौरव आर्य यांनी व्यक्त केले.जम्मू काश्मीर स्टडी सर्कलद्वारे काश्मीर विलय दिवसानिमित्त मेजर गौरव आर्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन मंगळवारी चिटणवीस सेंटर येथे करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून मीरा खडक्कार व स्टडी सर्कलचे संचालक मनु नायर उपस्थित होते. यावेळी त्यांनी काश्मीरच्या अवस्थेवर भाष्य करीत, तिथे सुरू असलेल्या हिंसाचाराला तेथील नेतेच खतपाणी घालत असून हा निव्वळ पॉलिटिकल ड्रामा असल्याचे म्हणाले. काश्मीरच्या आतंकवादाबद्दल बोलताना ते म्हणाले की, १९८९ च्या सुमारास काश्मिरात पाकिस्ताना आतंकवाद फोफावला. त्यावेळी १० हजारावर आतंकवादी काश्मिरात शिरले होते. उघड्यावर एके-४७ व पाकिस्तानचा झेंडा फडकवित होते. त्यावेळी भारतीय सेनेने सरकारला एक डॉक्युमेंट पाठविले. सरकारने ते मान्य केल्यानंतर भारतीय सेनेने राष्ट्रीय रायफल सेना तयार करून पाठविली. या सेनेने आंतकवाद्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले. राष्ट्रीय रायफ ल सेनेने तेव्हा दररोज शेकडो एन्काऊंटर काश्मिरात केले. आज तर काश्मिरात दीडशेही आंतकवादी नाहीत.त्यामुळे पाकिस्तानने तिथे आता इस्लामिक आयडॉलॉजी वापरणे सुरू केले आहे. काश्मिरात गेल्या १० वर्षात शेकडो मदरसे बनले आहे. यातून हिंसा शिकविली जात आहे. हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. हिंसाचारात दगडफेक, जाळपोळ करण्यात येते, त्यांना पैसे दिले जात आहे. काश्मिरातले हे दोन्ही नेते त्यास जबाबदार आहेत.भारत सरकारला काश्मीरचा आतंकवाद संपवायचा असेल तर राष्ट्रपती राजवट किमान १० ते १५ वर्षासाठी लावली पाहिजे. हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या मदरशांना, सोशल मीडियातून हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणांवर निर्बंध लावावे लागेल. सर्जिकल स्ट्राईक करून फायदा नाही, तर पाकिस्तानी सेनेवर जबर हल्ला करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमेहबूबा मुफ्ती