मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याने चिंचपोकळी, करी रोड येथे लोकल थांबणार नाहीत. पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. या वेळी लोकल जलद मार्गावरून धावतील. तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत लोकल रद्द करण्यात येतील. भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान आज सकाळी १०.४२ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत भायखळा स्थानकातून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धिम्या लोकल भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. या लोकलना दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबा असेल. मात्र, विद्याविहारपासून त्या धिम्या मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करी रोड येथे लोकलला थांबा नसेल.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; या स्थानकांवर थांबणार नाहीत लोकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 08:09 IST