शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटणार

By admin | Updated: May 16, 2017 02:12 IST

धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी संपूर्ण पुराव्यासह शिवसेनेच्या २१ खासदार व मंत्र्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असे ....

शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वीकारले धनगर समाजाचे निवेदनलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी संपूर्ण पुराव्यासह शिवसेनेच्या २१ खासदार व मंत्र्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले.खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी समितीच्या शिष्टमंडळात नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे, धनगर युवक मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील, ज्ञानेश्वर घायवट, नारायण खरवडे, प्रा. राजू गोरडे, प्रा. अमित ठमके, नामदेव खाटके, नवनाथ ढगे, पिपराजी महाका, सूर्यकांत गोखणे, दिनकर नागे, बजरंग गडदे, शिरीष उगे, हेमराज डाखोळे आदी पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यात आली. रमेश पाटील यांनी भेटीविषयी माहिती देताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिष्टमंडळाला आश्वासक शब्द दिला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने भाजपा व शिवसेनेला मदत केली. भाजपाने शब्द फिरविला असला तरी सेनेला त्याची जाणीव असल्याचे ते म्हणाले. भाजपाप्रमाणे शिवसेना धनगर समाजाच्या नेत्यांना मंत्रिपद किंवा मंडळे देऊ शकत नाही. मात्र समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कळीचा आहे. त्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदार व मंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून विचारणा करणार असे आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुखांनी दिल्याची माहिती रमेश पाटील यांनी दिली.