शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मेडिट्रिना हॉस्पिटलने लावला केंद्र व राज्य शासनाला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:18 PM

रामदासपेठ येथील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससेस (हॉस्पिटल)ने राज्य शासन व केंद्र शासनाची फसवणूक करून खोट्या बिलापोटी रक्कम वसूल केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देउपचाराच्या क्लेम बिलापोटी अवैध वसुली : प्रशासनाची चुप्पी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रामदासपेठ येथील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससेस (हॉस्पिटल) आर्थिक घोटाळे आणि फसवणुकीत चर्चेचा विषय ठरले आहे. हॉस्पिटलने राज्य शासनाच्या योजना मुख्यत: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील (महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना) लाभान्वित आणि राज्य शासन व केंद्र शासनाची फसवणूक करून खोट्या बिलापोटी रक्कम वसूल केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.हॉस्पिटलने बिलाची रक्कम अवैधरीत्या वसूल केल्याचे सिद्ध झाल्यानंतर राज्य शासनाने आपल्या पॅनलवरून या हॉस्पिटलला निलंबित केले आहे. आता हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यात येत नाहीत. पण यापूर्वी हॉस्पिटलने रुग्णांवरील उपचाराची खोटी बिले तयार करून शासनाकडून वसूल केलेल्या रकमेचे काय, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हॉस्पिटलने शासनाला चुना लावला, पण वसुलीसंदर्भात शासनाने चुप्पी साधली आहे. हे हॉस्पिटल योजनेतील लाभान्वित रुग्णांकडून अवैध वसुली करण्याचे साधन बनले आहे.याचप्रमाणे हॉस्पिटलने शासनाच्या अन्य योजना आणि सीजीएचएस योजनेतील (केंद्र शासनाची पेन्शनर्ससाठी स्वास्थ्य योजना) लाभान्वितांकडून अवैध वसुली आणि खोट्या बिलाद्वारे केंद्र शासनालाही चुना लावला आहे. त्याची कागदपत्रे लोकमतकडे आहेत. हॉस्पिटलने योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार केलेल्या बिलाची यादी मोठी आहे. ही यादी १ आॅक्टोबर २०१५ ते ९ मार्च २०१८ पर्यंतची आहे. हॉस्पिटलने रुग्णांवर केलेल्या उपचाराच्या ३ कोटी ९३ लाख ९८ हजार रुपयांच्या बिलाचे क्लेम सीजीएचएस कार्यालय, नागपूर येथे जमा केले. विभागाने तपासणी करून ३० टक्के बिलाची रक्कम कापून ३ कोटी ११ लाख ३४ हजार रुपये मंजूर केले. विभागाने ८२ लाख ६४ हजार रुपयांची रक्कम क्लेम बिलातून कापली. काही रुग्णांवरील उपचाराचा क्लेम अर्धा आणि अर्ध्यापेक्षा कमी मिळाला आहे. त्यानंतरही हॉस्पिटलने यावर कोणतीही आपत्ती न घेता रक्कम स्वीकारली. बहुतांश बिले खोटी तयार करून सादर केल्याचे यावरून दिसून येते. ३० टक्के क्लेम बिलाची रक्कम कापून मिळालेल्या रकमेतही गौडबंगाल आहे. यात सीजीएचएस नागपुरातील काही अधिकाऱ्यांसोबत संगनमत असल्याचा आरोप सूत्रांनी केला. याशिवाय राज्य आणि केंद्र सरकारच्या अन्य विभागातील कर्मचारी आणि अधिकारी व त्यांच्या आश्रितांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या कराराची (एन्पॅनलमेंट) तपासणी व्हावी, असे सूत्रांनी सांगितले.हॉस्पिटल आणि सर्व संचालकांची उच्चस्तरीय तपासणी आणि ऑडिट करण्याची मागणी सूत्रांनी केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार