शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

मेडिकल होणार ‘स्ट्रेचर फ्री’

By admin | Updated: December 19, 2015 02:45 IST

रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेंडंटचीही महत्त्वाची भूमिका असते, परंतु मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) या दोघांचाही तुटवडा आहे.

‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’ आली : राज्यातील पहिलाच प्रयोगनागपूर : रुग्णालयात जीवनरक्षक उपकरणांसोबतच स्ट्रेचर आणि अटेंडंटचीही महत्त्वाची भूमिका असते, परंतु मध्य भारतातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) या दोघांचाही तुटवडा आहे. कधी स्ट्रेचर राहते तर अटेंडंट राहत नाही. ही बिकट वेळ निभावून नेताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची दमछाक होते. यावर पर्याय म्हणून मेडिकल प्रशासनाने ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’ची मदत घेतली आहे. यातील एक अ‍ॅम्ब्युलन्स शुक्रवारी मेडिकलमध्ये उपलब्ध झाली असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. मेडिकलमध्ये ४६ वॉर्ड मिळून १४०१ खाटांची व्यवस्था आहे. बाह्य रुग्ण विभागात रोज अडीच हजारावर रुग्णांची तपासणी केली जाते. परंतु अपघात विभाग असो किंवा बाह्यरुग्ण विभाग, येथे स्ट्रेचर्ससाठी रुग्णाच्या नातेवाईकांना शोधाशोध करावी लागायची. अनेकवेळा गंभीर रुग्णांना पाठीवर घेऊन वॉर्डात नेण्याची वेळ नातेवाईकांवर यायची. अनेकवेळा स्ट्रेचर मिळाले तर अटेंडंट मिळत नसे. यातच सरकारने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद केल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. आधीच कर्मचारी कमी आणि त्यात वेळही जास्त लागत असल्याने यावर पर्याय शोधणे गरजेचे झाले होते, त्यामुळे प्रशासनाने ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’ खरेदीसंदर्भात जूनमध्ये प्रस्ताव पाठविला होता, तो मंजूर करण्यात आला. हैदराबादच्या तेजस्विनी डीलरकडून हे वाहन खरेदी करण्यात आले आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. एक दिवस चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर हे वाहन पूर्णत: सेवेत दाखल होणार आहे. सध्या मेडिकलमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची २५० वर पदे रिक्त आहेत. पदभरती करण्याकडे शासन लक्ष देत नसल्याने भार कमी करता यावा म्हणून प्रशासनाला हे वाहन खरेदी करावे लागले आहे. (प्रतिनिधी)अशी आहे ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’या ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स’ची किंमत जवळपास साडेसहा लाख रुपये आहे. हे आॅटोमॅटिक अ‍ॅम्ब्युलन्स वाहन बॅटरीवर चालते. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभाग किंवा अपघात विभागापासून कोणत्याही वॉर्डात हे वाहन सहज रुग्ण पोहचवू शकते. रुग्ण ने-आण करण्यासाठी वेळही नेमून दिला जाणार आहे. एक प्रशिक्षित कर्मचारीच ने-आण करेल. यामुळे मनुष्यबळ वाचणार आहे. या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रुग्ण व त्यांच्यासोबत दोन नातेवाईक बसण्याची व्यवस्था राहणार आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास गरजेएवढ्या ‘इनहाऊस अ‍ॅम्ब्युलन्स बोलविण्यात येणार असल्याची माहिती आहे.