शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

 तीन रुग्णांच्या जीवासाठी रात्रभर जागे होते मेडिकल

By सुमेध वाघमार | Updated: April 3, 2024 20:43 IST

 शेतमजुर वडीलाचा पुढाकार : २३ वर्षीय मुलीचे केले अवयवदान.

 नागपूर : २३ वर्षीय मुलीचे ‘ब्रेन डेड’ झाल्याचे समजताच तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. डॉक्टरांच्या समुपदेशनानंतर शेतमजुर असलेल्या वडिलांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला आणि मंगळवारी रात्री ९ ते बुधवारी पहाटे ४ वाजेपर्यंत मेडिकलशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिघांना जीवनदान देण्यासाठी जागे होते. यावेळी अधिष्ठात्यांपासून ते वैद्यकीय अधीक्षक आणि इतरही वरीष्ठ डॉक्टर उपस्थित होते.

मध्यप्रदेशातील २३ वर्षीय मुलीची अचानक प्रकृती खालवली.  तिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. सलग ९ दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. उपचाराला प्रतिसाद देत नसल्यचे पाहत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. अर्चना अहेर, डॉ. सचीन कांबळे, डॉ. संजय रामटेके व डॉ. राज कोंडावार यांनी तिला तपासून ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. याची महिती तिच्या कुटुंबियांना दिली.  तिचे ४६ वर्षीय वडील, ४० वर्षीय आई व २० वर्षीय भाऊ आणि इतरही नातेवाइक उपस्थित होते. ‘सुपर’चे डॉ.सुनील वाशिमकर, डॉ. सुमीत चाहाकर, भाग्यश्री निघोट यांनी त्यांना अवयवदानाविषयी माहिती दिली. शेतमजुर असलेले तिच्या वडीलांनी वेळ मागितला. मुलीच्या अवयवाची राख करण्यापेक्षा इतरांना जीवनदान देण्याची गोष्ट त्यांना पटली. त्यांनी मुलीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. 

-एक महिला, दोन पुरुषाना नवे जीवन‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांनी प्रतीक्षा यादी तपासून अवयवांचे वाटप केले. परंतु रात्रीचे ९वाजले होते. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात डॉक्टरांच्या पथकाने अवयव काढण्याला सुरुवात केली. तर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या ३३ वर्षीय तरुणीवर किडनी प्रत्यारोणासाठी दुसºया डॉक्टरांच्या टिमने तयारी केली. बुधवारी पहाटे ४ वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्या रात्रीच दुसरी किडनी एका खासगी हॉस्पिटलमधील ५५ वर्षीय पुरुषाला तर लिव्हर त्याच खासगी हॉस्पिटलमधील ६५ वर्षीय पुरुषाला दान करण्यात आले. कॉर्निआ मेडिकलच्या नेत्ररोग विभागाला दान करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर