शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोविडवरील संभाव्य औषधाची मेडिकलमध्ये चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:46 IST

चीनमध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या औषधावर फेब्रुवारी महिन्यापासून चाचणी सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधशास्त्र विभागाने जपानमधील ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या ‘अ‍ॅन्टीफ्लू मेडिसीन’ची वैद्यकीय चाचणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देऔषधवैद्यकशास्त्र विभागात संशोधन२७ रुग्णांवर चाचणी सुरू

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधशास्त्र विभागाने जपानमधील ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या ‘अ‍ॅन्टीफ्लू मेडिसीन’ची वैद्यकीय चाचणी सुरू केली आहे. २७ रुग्णांना हे औषध दिले असून काहींवर सकारात्मक परिणाम आढळून आला आहे. लवकरच ‘ड्रग कंट्रोलर जनरल इंडिया’कडे या संदर्भातील अहवाल पाठविला जाण्याची शक्यता आहे. कोविड-१९वर औषध अद्यापही उपलब्ध नाही. जगात विविध देशात वेगवेगळ्या औषधांना घेऊन चाचणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संशोधनात्मक स्तरावर औषधांचा वापर करून बघण्याचा सल्ला दिला होता.

गपूर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यानुसार जपान येथे उत्पादित होणाऱ्या ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ हे ‘अ‍ॅन्टीफ्लू मेडिसीन’ची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जपानकडून या औषधाची मागणी केली. औषध उपलब्ध होताच २७ रुग्णांवर त्याची चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे, जपान, युके व रशियामध्येही या औषधाने अनेक रुग्ण बरे झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु अंतिम निष्कर्षापर्यंत अद्यापही कुणीच पोहचले नाही. आपल्याकडे या औषधाचे चांगले निकाल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रशियामध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ औषधाचा उपचारात समावेशप्राप्त माहितीनुसार, चीनमध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या औषधावर फेब्रुवारी महिन्यापासून चाचणी सुरू आहे. इटलीमध्ये मार्च महिन्यापासून, अमेरिकेत एप्रिल महिन्यापासून तर इंग्लंडमध्ये मे महिन्यापासून संशोधन सुरू आहे. रशियामध्ये या औषधावरील संशोधन संपले असून त्यांना चांगले परिणाम मिळाले आहेत. यामुळे त्यांनी २९ मे पासून उपचारामध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या औषधाचा समावेशही केला आहे.

इव्हर्मेक्टिन, अँजिथ्रोमायसिन आणि प्लाझ्मा थेरपीवरही संशोधनमेडिकलमध्येच ‘इव्हर्मेक्टिन’ आणि ‘अँजिथ्रोमायसिन’ या औषधांच्या मिश्रणाची वैद्यकीय चाचणी काही बाधितांवर सुरू आहे. याचेही चांगले परिणाम समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्लाझ्मा थेरपीवरही संशोधन सुरू असून, पहिल्या टप्प्यात बाधित नसलेल्या रुग्णाचा प्लाझ्माही घेण्यात आला आहे. यावरील निष्कर्ष लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

सचिव डॉ. मुखर्जी यांनी केले ट्वीटवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी याला घेऊन ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध औषधांवर संशोधन सुरू आहे. त्यापैकी ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या ‘अ‍ॅन्टीफ्लू मेडिसीन’वर चाचणी सुरू आहे. नागपूर, मुंबई व औरंगाबाद मेडिकलमध्ये चाचणीला सुरुवात झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.लवकरच निष्कर्षावर पोहचणारमेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात औषधवैद्यकशास्त्र विभागात ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ ‘अ‍ॅन्टीफ्लू मेडिसीन’ची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. २७ रुग्णांवर याचे संशोधन केले आहे. या औषधाचा रुग्णांवर काय परिणाम झाला यावरील निष्कर्ष लवकरच ‘ड्रग कंट्रोलर जनरल इंडिया’कडे सादर केला जाणार आहे.- डॉ. राजेश गोसावी, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस