शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्तीच्या प्रतीक्षेत दिवसभर उपाशी भटकत होता मेडिकल स्टाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 11:38 IST

Nagpur News आमदार निवासातील कोविड केअर सेंटरची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपूर विभागातील विविध जिल्ह्यातून पोहोचलेल्या मेडिकल स्टाफला नियुक्तीपत्र मिळण्यासाठी दारोदार भटकावे लागले.

ठळक मुद्देकधी मनपा, कधी जिल्हा परिषद तर कधी आमदार निवासात मारल्या फेऱ्या

आशिष दुबे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या काळात प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणाचा फटका डॉक्टर व मेडिकल स्टाफला बसला. आमदार निवासातील कोविड केअर सेंटरची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपूर विभागातील विविध जिल्ह्यातून पोहोचलेल्या मेडिकल स्टाफला नियुक्तीपत्र मिळण्यासाठी दारोदार भटकावे लागले.

लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजता नागपूर विभागातील काही जिल्ह्यातून मेडिकल स्टाफचे लोक नागपुरात पोहचले. पहिले ते नियुक्तीचा आदेश मिळविण्यासाठी मनपात पोहचले. तेथून त्यांना आमदार निवासात पाठविण्यात आले. परंतु तिथे कुठलाही अधिकारी नव्हता. सोबतच ज्या दोन ठिकाणी कोविड केअर सेंटर बनविण्यात आले आहे, तेही रिकामे होते. त्यामुळे मेडिकल स्टाफ पुन्हा मनपात परत आला. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले. जिल्हा परिषदेतूनही त्यांना आमदार निवासात पाठविण्यात आले. आमदार निवासातून माहिती देण्यात आली की, तिथे नोडल अधिकारी नाही आहे. तिथे असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्याला नियुक्त करून घेण्याचे अधिकार नाही. त्यामुळे त्यांना पीडब्ल्यूडीमध्ये पाठविण्यात आले. पीडब्ल्यूडीमध्ये गेल्यानंतर परत त्यांना मनपात पाठविण्यात आले.

- कुणीही केली नाही व्यवस्था

मेडिकल स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी ते आमदार निवासात बनलेल्या सीसीटीमध्ये कार्यरत होते. २० नोव्हेंबर २०२० रोजी त्यांची सेवा समाप्त करण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा बोलाविण्याचे तोंडी आदेश देण्यात आले. त्यांना नियुक्तीपत्र नागपुरात मिळेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सकाळीच ते नागपुरात पोहचले. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद होते. अशापरिस्थितीत त्यांना उपाशीतापाशी भटकावे लागले. मनपा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने त्यांची खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस