शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

मेडिकल कर्मचारी २० पासून संपावर

By admin | Updated: June 11, 2014 01:31 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या ४०० जागा रिक्त आहेत. मागील दहा वर्षांपासून या जागाच भरण्यात आल्या नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या ४०० जागा रिक्त नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या ४०० जागा रिक्त आहेत. मागील दहा वर्षांपासून या जागाच भरण्यात आल्या नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. रुग्णसेवाही प्रभावित झाली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी २० जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे कर्मचारी आपल्या मागण्यांना घेऊन १४ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार होते, तसे पत्रही अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना दिले होते. डॉ. पोवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात थेट वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी चर्चा घडवून आणली. डॉ. शिनगारे यांनी रिक्त पदे भरतीचे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु चार महिने उलटूनही काहीच झाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. मेडिकलमध्ये ८२० चतुर्थ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. ही पदे २५ वर्षांपूर्वीची आहेत. त्यावेळी मेडिकलमध्ये १४०० खाटा, २०-२५ वॉर्ड होते. रुग्णांची संख्याही कमी होती. आता यात वाढ झाली आहे. सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये १५०० वर खाटा आहेत. ४६ वॉर्ड आहेत तर ३६ विविध विभाग आहेत. असे असताना मागील दहा वर्षात रिक्त होत गेलेल्या जागाच भरण्यात आलेल्या नाहीत. यातच अनुकंपातत्त्वावर १७ कर्मचाऱ्यांची भरतीही करून घेण्यात आली नाही. तब्बल ४०० पदे रिक्त आहेत. यातील २०-२५ कर्मचारी आजार आणि विविध कारणांमुळे गैरहजर असतात. परिणामी ३६० कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी आली आहे. यामुळे रुग्णालयात सफाई व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. रुग्ण सेवाही प्रभावीत झाली आहे. या सर्व समस्यांना घेऊन महाराष्ट्र जाती-जमाती कर्मचारी संघाचे शिष्टमंडळाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)