शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : दोन कोटीतून होणार २५ व्हेंटिलेटरची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:28 IST

रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे हा प्रस्ताव येताच त्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून २ कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून लवकरच वयस्क व लहान मुलांसाठी २५ व्हेंटिलेटरची खरेदी केली जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा खनिज प्रतिष्ठानचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपकरणांची संख्या तोकडी पडत आहे. रुग्णालयात खाटांची संख्या २५००वर गेली असून व्हेंटिलेटर केवळ २२ आहेत. यातही पाच बंद स्थितीत आहे. विशेष म्हणजे, दरदिवशी व्हेंटिलेटरला घेऊन गोंधळ उडतो. रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे हा प्रस्ताव येताच त्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून २ कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून लवकरच वयस्क व लहान मुलांसाठी २५ व्हेंटिलेटरची खरेदी केली जाणार आहे.रुग्णला कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचे कार्य अत्याधुनिक यंत्र व्हेंटिलेटर करते. सध्या मेडिकलच्या अतिदक्षता विभागात आठ, शस्त्रक्रियेच्या ‘रिकव्हरी’ वॉर्डात तीन, बालरोग विभागात दोन, ‘मेडिसीन’ व ‘सर्जरी’ आकस्मिक विभागात प्रत्येकी दोन तर स्वाईन फ्लू वॉर्डातील पाच व्हेंटिलेटर आहेत. यातील पाच नादुरुस्त आहे. धक्कादायक म्हणजे, मेडिकलमध्ये रोज नव्या येणाऱ्या चार-पाच गंभीर रुग्णांना या व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु ते वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांवर नाईलाजाने हाताने रबरी फुगा दाबून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची वेळ येते. याला वैद्यकीय भाषेत ‘बॅग अ‍ॅण्ड मास्क व्हेंटिलेशन’ असे म्हणतात. यामुळे गंभीर रु ग्णांचा जीव धोक्यात येतो. अनेकवेळा खासगी हॉस्पिटलमधून मेडिकलमध्ये रुग्ण आणायचा असल्यास व्हेंटिलेटर आहे किंवा नाही त्याची माहिती घ्यावी लागते. काही रुग्णाचे नातेवाईक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी आमदार, खासदारांकडून प्रशासनावर दबावही आणतात. व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. व्हेंटिलेटरीच गरज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढेही मांडण्यात आली. याची गंभीरतेने दखल घेत त्यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर मार्फत व्हेंटिलेटरसाठी २ कोटी ८८ लाख, ३७ हजार रुपये मंजूर करून दिले. यातून ‘अ‍ॅडल्ट’ आणि ‘पेडियाट्रिक’साठी लागणाऱ्या २५ व्हेंटिलेटरची खरेदी केली जाणार आहे. या खरेदीला शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्सकडून या यंत्राची खरेदी केली जाणार आहे. यामुळे येत्या काळात मेडिकलमधील व्हेंटिलेटरची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.नव्या अतिदक्षता विभागाला हवे ९० व्हेंटिलेटरमेडिकलमध्ये प्रत्येक ३०-३० खाटांचे ‘सर्जिकल इन्टेसिव्ह केअर युनिट’, ‘मेडिसीन इन्टेसिव्ह केअर युनिट’ आणि ‘नवजात शिशू इन्टेसिव्ह केअर युनिट’चे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच यंत्रसामुग्री उपलब्ध होऊन रुग्णसेवेत हे अतिदक्षता विभाग रुजू होणार आहे. मेडिकल प्रशासनाने प्रत्येक विभागासाठी ३० व्हेंटिलेटर अशा ९० व्हेंटिलेटरची मागणी केल्याची माहिती आहे.ट्रॉमात हवे २५ व्हेंटिलेटरअपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने रुग्णसेवा उपलब्ध होण्यासाठी मेडिकलने ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले. मात्र ७२ खाटांच्या या सेंटरमध्ये केवळ १७ व्हेंटिलेटर आहेत. रुग्णांची संख्या पाहता आणखी २५ व्हेंटिलेटरची गरज आहे. तसा प्रस्तावही मेडिकल प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयfundsनिधी