शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मेडिकल : आणिखी एका रुग्णावर प्लाझ्मा थेरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:56 IST

‘प्रोजेक्ट प्लॅटिना’च्या (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) माध्यमातून मेडिकलमध्ये आणखी एका रुग्णाला प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्लाझ्माचा दुसरा डोज चढविण्यात आला. कोरोनावरील उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे.

ठळक मुद्दे चोवीस तासाच्या अंतराने दिला दुसरा डोज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’च्या (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) माध्यमातून मेडिकलमध्ये आणखी एका रुग्णाला प्लाझ्मा थेरपी देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्लाझ्माचा दुसरा डोज चढविण्यात आला. कोरोनावरील उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या नेतृत्वात ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ प्रकल्प हाती घेतला आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या ४७२ रुग्णांवर राज्यभरात चाचणी केली जाणार आहे. याची सुरुवात मागील महिन्यात झाली. एवढ्या मोठ्या संख्येतील रुग्णांवर पहिल्यांदाच चाचणी होत आहे. परंतु कठोर नियमांमुळे चाचणीच्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यास वेळ लागणार आहे. शुक्रवारी प्लाझ्मा देण्यात आलेला रुग्ण हा मध्यम लक्षणांकडून गंभीर लक्षणांकडे जात होता. चाचणीत तो बसत असल्याने २०० मिली प्लाझ्माचे एक दिवसाच्या अंतराने दोन डोज देण्यात आले. या रुग्णाच्या प्रकृतीवर डॉक्टरांच्या चमूचे लक्ष आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’चे प्रभारी व स्टेट नोडल अधिकारी डॉ. मो. फैजल, या प्रकल्पातील चाचणीचे प्रमुख अन्वेषक आणि संयोजक डॉ. सुशांत मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, रक्तपेढी प्रमुख डॉ. संजय पराते आदींच्या देखरेखीखाली ही चाचणी केली जात आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या