शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे डॉक्टर आता दिसणार ‘अ‍ॅप्रॉन’मध्ये; सुसंवाद वाढविण्याचाही प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 20:35 IST

Nagpur News शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टर आता पांढरा कोट म्हणजे ‘अ‍ॅप्रॉन’मध्ये दिसणार आहे.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टर आता पांढरा कोट म्हणजे ‘अ‍ॅप्रॉन’मध्ये दिसणार आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी याबाबतचे निर्देश सर्व विभागप्रमुखांना दिले. विशेष म्हणजे, या माध्यमातून डॉक्टर-रुग्णांमध्ये सुसंवाद वाढविण्याच्या प्रयत्नालाही त्यांनी हात घातला आहे.

शासकीय रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर, विद्यार्थी, अध्यापक तसेच तंत्रज्ञांना ‘अ‍ॅप्रॉन’ घालूनच कार्यरत राहावे, असा ‘मेडिकल इथिक्स’चा नियम आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाचे कोणी मोठे अधिकारी किंवा नेते मंडळी आल्यावरच वरिष्ठ डॉक्टरांपासून ते कनिष्ठ डॉक्टरांना ‘अ‍ॅप्रॉन’ची आठवण होत होती. ‘अ‍ॅप्रॉन’ नसल्याने मेडिकलच्या गर्दीत डॉक्टर-रुग्ण ओळखणे कठीण झाले होते. परिणामी, गैरसमज निर्माण होऊन वादाचे प्रसंग निर्माण होत होते.

याचीच दखल घेत तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी २०१४ मध्ये सर्व डॉक्टरांना ‘अ‍ॅप्रॉन’ची सक्ती केली. ‘अ‍ॅप्रॉन’ न घातलेल्या डॉक्टरांना ते आपल्या केबिनमध्ये येऊ देत नव्हते. यामुळे डॉक्टरांच्या अंगावर कधी नव्हे ते ‘अ‍ॅप्रॉन’ दिसू लागले. परंतु डॉ. निसवाडे हे निवृत्त होताच ‘अ‍ॅप्रॉन’चाही विसर पडला. ‘लोकमत’ने २२ आॅगस्टच्या अंकात ‘कोण डॉक्टर, कोण रुग्ण, समजणार कसे?’ या मथळ्याखाली या वृत्ताला वाचा फोडली. याची गंभीर दखल अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांनी घेतली. त्यांनी मंगळवारी विभागप्रमुखांच्या नावे पत्र काढून कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्टरांना अ‍ॅप्रॉन घालण्याचे निर्देश दिले. त्याची जबाबदारी सर्व विभागप्रमुखांवरही टाकली. यामुळे मंगळवारी बहुसंख्य डॉक्टर ‘अ‍ॅप्रॉन’मध्ये दिसले. 

-‘अ‍ॅप्रॉन’ची जबाबदारी विभागप्रमुखांवर -डॉ. सुधीर गुप्ता

‘लोकमत’शी बोलताना अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, वरिष्ठांपासून ते कनिष्ठ डॉक्टरांनी  अ‍ॅप्रॉन घालूनच रुग्णसेवा देणे अपेक्षित आहे. परंतु अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विभागप्रमुखांच्या नावाने पत्र काढून त्यांच्या विभागातील डॉक्टरांनी अ‍ॅप्रॉन घालण्याचे निर्देश दिले. रुग्णालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी याची मदत होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय