शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

मेडिकलमधील डॉक्टरांनी नक्षलग्रस्त भागात जाऊन केली शस्त्रक्रिया; १२ रुग्णांना दिले नवे आयुष्य

By सुमेध वाघमार | Updated: March 21, 2024 20:42 IST

कुष्ठरोगामुळे वाकडे झालेल्या हात-पायावर सर्जरी

सुमेध वाघमारे, नागपूर: विदर्भात कुष्ठरोगाचे सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळून येतात. कुष्ठरोगामुळे येणारी शारीरिक विकृती आणि अपंगत्व ही त्या व्यक्तींच्या आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करते. याची दखल घेत नागपूर मेडिकलमधील प्लास्टिक सर्जरी विभागाचा चमूने गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात जावून कुष्ठरोगाच्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यांना नवे आयुष्य दिले.

कुष्ठरोग म्हणजे ‘लेप्रसी’. या रोगाचे कारण ‘मायकोबॅक्टेरियम लेप्रे’ नावाचा जिवाणू असतो. जर तो बराच काळ एखाद्या माणसाच्या शरीरात टिकून राहिला तर शरीरातले मज्जातंतू, त्याची त्वचा आणि त्याची हाडे खराब करून टाकतो. कुष्ठरोगात महाराष्टÑ चवथ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक रुग्ण विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यात आढळून येतात. सहायक संचालक आरोग्य विभागाच्या गडचिरोली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये कुष्ठरोगावर उपचारासाठी आलेल्या १५वर रुग्णांची तपासणी केली. यातील १२ रुग्णांमधील कोणाचे हात तर कोणाचे पाय वाकडे झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज होती.

आरोग्य विभागाने मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागाशी संपर्क साधला त्यांनी गडचिरोली येथे येऊन शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत डॉ. पाटील व त्यांच्या डॉक्टरांच्या चमूने २ मार्च रोजी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त प्रभावित भागात जाऊन कुष्ठरोग रुग्णांची तपासणी केली. १५ आणि १६ मार्च रोजी त्यातील १२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यात सहा महिला व सहा पुरुष रुग्ण होते. ही सर्जरी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे सहायक संचालक डॉ. सचिन हेमकेयांच्या पुढाकारात डॉ. सुखेन दोशी, डॉ. मयंक भासीन, डॉ.प्रभाकर रोखोंडे, डॉ. अंशू गांधी आणि डॉ. वर्षा पटनाइक आदींनी यशस्वी केली. यात गडचिरोली येथील सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टर व बधिरीकरण तज्ज्ञाचीही मदत झाली. 

कुष्ठरोगावरील शस्त्रक्रिया जीवनाची गुणवत्ता वाढवते

कोरोनापूर्वी मेडिकलच्या डॉक्टरांची चमू गडचिरोली जिल्ह्यात जाऊन जवळपास १०० कुष्ठरोगाचा रुग्णांची तपासणी केली होती. त्यातील १० ते १२ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली. उर्वरीत रुग्णांना मेडिकलला येण्यास सांगितले होते. परंतु कोणीच नाही. या रुग्णांची बोली भाषा वेगळी असल्याने ते नागपुरात येण्यास तयार नसल्याचे समजते. यामुळे या वर्षी आम्ही तिथे जाऊन शस्त्रक्रिया केली. या रुग्णांवरील ही शस्त्रक्रिया जीवनाची गुणवत्ता वाढवणारी ठरेल. -डॉ. नरेंद्र पाटील, प्रमुख प्लास्टिक सर्जरी विभाग मेडिकल

टॅग्स :nagpurनागपूर